Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

एअरपोर्ट रोडवर रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा-५ जण रंगेहात पकडले

शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एअरपोर्ट रोडलगत हॉटेलच्या मागील आडोशाला सुरू असलेल्या रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाच जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक बसवला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


📞 गोपनीय बातमीवरून छापा
दि. १५/०२/२०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नांदुख (ता. राहाता) येथील एअरपोर्ट रोड परिसरात काही इसम ५२ पत्त्यांवर १०० रुपये प्रति डाव या प्रमाणे हारजितीचा रमी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने पंचांसह तात्काळ छापा टाकला.
दुपारी सुमारे ३.३० वाजता छापा टाकण्यात आला असता पाच इसम हातात पत्ते घेऊन समोर पैसे टाकून जुगार खेळताना आढळून आले.


👮‍♂️ पंचासमक्ष कारवाई; मुद्देमाल जप्त
पोलिसांनी स्वतःची ओळख करून देत संबंधितांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांच्या झडतीतून रोख रक्कम, ५२ पत्त्यांचा कॅट व जुगार खेळण्यासाठी वापरलेली साहित्य जप्त करण्यात आली. तसेच घटनास्थळी वापरण्यात आलेल्या मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या.
चौकशीत संबंधित इसम १०० रुपये प्रति डाव प्रमाणे रमी जुगार खेळत असल्याचे कबूल केले.


⚖️ गुन्हा दाखल; कायदेशीर कारवाई सुरू
सदर प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जप्त मुद्देमाल पोलीस ताब्यात घेण्यात आला आहे.


🚨 बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांना इशारा
शिर्डी पोलीसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, शहर व पंचक्रोशीत कुठेही बेकायदेशीर जुगार, मटका किंवा इतर अवैध धंदे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button