Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरशिर्डी

“साई नामाचा जयघोष करत पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी सर केले ‘माऊंट लोहत्से’ शिखर”

अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे, मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर, ‘माऊंट लोहत्से’ (Mount Lhotse), यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचा छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

“साई नामाचा जयघोष” करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवले.ही मोहीम अत्यंत कठीण आणि धाडसपूर्ण असून, यासाठी अपार शारीरिक व मानसिक तयारी आवश्यक असते. हिमालयातील कठोर हवामान, प्रचंड थंडी आणि कमी ऑक्सिजनच्या आव्हानांना तोंड देत डोखे यांनी आपल्या दृढ श्रद्धा, निष्ठा आणि जिद्दीचे दर्शन घडवले.

भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी डोखे म्हणाल्या, “या साहसी मोहिमेची सुरुवात मी शिर्डीच्या दर्शनाने केली होती. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबांचे नाव हिमालयात पोहोचवण्याची विनंती केली होती. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आली याचा मला विशेष अभिमान आहे.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button