Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगर

वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर

अहमदनगर, दि.१८ जूलै २०२४ (जिमाका)- वाळू डेपोपासून ते ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात वाळू पोहोचविण्यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुधारित भाडे दर निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण त्रिस्तरीय समितीने अहमदनगर जिल्ह्यासाठी हे सुधारित दर निश्चित केले आहेत. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीत सदस्य पोलीस अधीक्षक व सचिव म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी हे कार्यरत आहेत. या समितीने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन प्रकारानुसार प्रतिकिलो मीटरनुसार दर ठरविले आहेत. सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत. हलके मालवाहू वाहन (१.५ टन पर्यंत) – ३१ रूपये, (१.५ टन ते ३.५ टन पर्यंत)- ३५.५ रूपये, (३.५ ते ७.५ टनपर्यंत) – ३८ रूपये दर आहे. तर मध्यम मालवाहू वाहन (७.५ टन ते १३ टनपर्यंत) – ४८ रूपये, जड मालवाहू वाहन (१३ टन ते १८.५ टन पर्यंत ) – ५६ रूपये, जड मालवाहू वाहन (१८.५ टन ते २८ टन पर्यंत)-६४ रूपये व जड मालवाहू वाहन (२८ टन ते ३५ टन पर्यंत)- ६८.५ असे सुधारित दर जाहिर केले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर व श्रीरामपूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button