Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
राजकीयशिर्डी

श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जटिल शस्त्रक्रियेला यश-लॅप्रोस्कोपीद्वारे धाडसी शस्त्रक्रिया-1.5 किलो गाठ यशस्वीपणे काढली

शिर्डी | श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जटिल शस्त्रक्रियेला यश
अहिल्यानगर जिल्‍ह्यातील राजुरी, येथील रुग्‍ण सरिता सुनिल पंडीत, वय 40 यांच्या पोटात तब्बल 1.5 किलो वजनाची भलीमोठी गाठ आढळून आली होती. गेल्या काही महिन्यांपासून अनेक नामांकित रुग्णालयांचे उंबरठे झिजवल्यानंतरही पोटातील गाठ अतिशय गुंतागुंतीच्या ठिकाणी असल्याने कोणतीही शस्त्रक्रिया करण्यास अनेक डॉक्टरांनी नकार दिला. वाढत्या धोक्यामुळे रुग्ण व कुटुंबीय मोठ्या चिंतेत होते. शेवटी त्यांनी आशेने श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी येथे धाव घेतली. येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पुजा सिंग यांनी सखोल तपासणीनंतर ही धोकादायक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही संभाव्य धोका स्वीकारत शस्त्रक्रियेला संमती दिली.
भूलतज्ज्ञ डॉ. महेंद्र तांबे यांच्या सहकार्याने, सर्जरी विभागाच्या टीमसह ही अतिशय अवघड व जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णास त्रास न देता, बिनटाक्याच्या पद्धतीने पूर्ण 1.5 किलोची विशाल गाठ एकाच प्रयत्नात यशस्वीपणे काढण्यात डॉक्टरांना यश आले. अशा प्रकारची दुर्मिळ व आव्हानात्मक शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती डॉ. पुजा सिंग यांनी दिली.
रुग्णालय प्रशासनाद्वारे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून सुरक्षितपणे घरी परतला आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक (से.नि.), उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथीली पितांबरे, आदींनी डॉ. पुजा सिंग व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
श्री साईनाथ रुग्णालय श्रद्धेसोबतच आरोग्यसेवेतील उत्तम सेवा व चमत्कारिक कार्यासाठीही आपली वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button