Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

रस्त्यावर गुटखा थुंकणाऱ्या तरुणावर कारवाई सर्जेराव कोते पाटील यांच्या जागरूकतेमुळे नगरपालिकेची तातडीची दखल

शिर्डी : स्वच्छ आणि सुंदर शिर्डी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा आदर्श संदेश देत, निस्सीम साईभक्त तथा श्री साईबाबा संस्थानचे मानकरी सर्जेराव कोते पाटील यांनी दाखविलेल्या जागरूकतेमुळे रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणाऱ्या एका तरुणावर नगरपालिकेने कारवाई करून दंड आकारला आहे.
काल रात्री सुमारे अकराच्या सुमारास नगरपालिकेजवळील एका कॉम्प्लेक्समधील वाणी नावाचा तरुण नांदुर्खी रोड परिसरात गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकत असल्याचे सर्जेराव कोते पाटील यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित तरुणाला शांतपणे समज देत, “भाऊ, रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकू नकोस. आपली नगरपालिका शहराच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करते. शिर्डी स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असे सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मात्र, संबंधित तरुणाने त्यांच्याकडे रागाने पाहिल्याचे तसेच त्याची वागणूक वेगळ्या पद्धतीची असल्याचे कोते पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत त्यांनी संबंधित प्रकाराचा फोटो काढला.
त्यानंतर हा फोटो नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील तसेच इतर नगरसेवकांना पाठविण्यात आला. या घटनेची तातडीने दखल घेत संबंधितांशी चर्चा करून आज त्या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या तातडीच्या कारवाईबद्दल सर्जेराव कोते पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील तसेच सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.


“घाण करणाऱ्यांविरोधात नागरिकांनीही पुढे यावे”
यावेळी सर्जेराव कोते पाटील यांनी शिर्डीकरांना आवाहन करताना सांगितले की, शिर्डी हे केवळ आपले शहर नसून देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी नगरपालिका मोठ्या प्रमाणात प्रयत्न व खर्च करत असते. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, गुटखा किंवा पान खाऊन रस्त्यावर थुंकणे असे प्रकार टाळले पाहिजेत.


“ज्यांना कुठेही रस्त्यावर थुंकणारे, कचरा टाकणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणारे व्यक्ती दिसतील, त्यांनी न घाबरता आणि निःसंकोचपणे संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी. नागरिकांच्या सहभागाशिवाय स्वच्छ आणि सुंदर शिर्डीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
सर्जेराव कोते पाटील यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार
एका नागरिकाने दाखविलेली जागरूकता आणि त्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतलेली तातडीची दखल, हे शहरातील स्वच्छतेसाठी निश्चितच सकारात्मक उदाहरण ठरणार आहे. प्रत्येक नागरिकाने अशाच प्रकारे आपली सामाजिक जबाबदारी पार पाडल्यास “स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डी” हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही.
— निस्सीम साईभक्त तथा श्री साईबाबा संस्थानचे मानकरी सर्जेराव कोते पाटील यांचे आवाहन

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button