Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

महिला कीर्तनकाराचा दुर्दैवी मृत्यू! आळंदीला जाणाऱ्या दिंडीवर काळाचा घाला

आळंदी –
ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी निघालेल्या उरण येथील भाविकांवर काळाने निर्दयी घाला केला आहे. आळंदीला जाणाऱ्या दिंडीमध्ये कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात उरण तालुक्यातील कीर्तनकार मंजुळा तांडेल (वय 54, रा. करळ) यांचा जागीच मृत्यू झाला असून 10 भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

sai nirman
जाहिरात

🔹 १८ वर्षांपासून सुरू असलेली अखंड दिंडी यात्रा

गेल्या 18 वर्षांपासून उरण तालुक्यातील जासई येथील शंकर मंदिरातून उरण ते आळंदी अशी पायी दिंडी काढली जाते. यंदाही 7 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. उरण, जासई, करळ, कामोठे, पारगाव आदी गावांतील सुमारे 150 भाविक यात सहभागी झाले होते. भक्तिभावाने कीर्तन, नामस्मरण आणि टाळमृदुंगांच्या निनादात ही दिंडी पुढे सरकत होती.

DN SPORTS

🔹 कामशेतजवळ अपघात — श्रद्धेचा प्रवास थांबला

11 नोव्हेंबरच्या रात्री दिंडीने कामशेत येथील काळभैरव मंदिरात मुक्काम केला होता. आज पहाटे सुमारे 5.45 वाजता दिंडी इंदुरीच्या दिशेने रवाना झाली असताना काही किलोमीटर अंतरावर मागून आलेल्या भरधाव कंटेनर ट्रेलरने दिंडीतील भाविकांना जोरदार धडक दिली. धडकेत कीर्तनकार मंजुळा तांडेल जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे भाविकांमध्ये भीती आणि शोककळा पसरली.


🔹 कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी कंटेनर चालक चंद्रशेखर रमाकांत याच्याविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघातग्रस्त भाविकांची विचारपूस सुरू असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.


🙏 समाजमनात शोकाची लाट

kamlakar

कीर्तनकार मंजुळा तांडेल या उरण परिसरात त्यांच्या भक्तीमय कीर्तनांसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने भाविकांमध्ये तसेच वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात निघालेली दिंडी आता दुःखाच्या अश्रूंनी ओलसर झाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button