Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागली चोरी!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत आता साईभक्त महिलांप्रमाणे स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून धूम स्टाईल चोरी होत आहे .त्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारची घबराट निर्माण झाली असून सोन्याचे दागिने घालावी की नाही? असा प्रश्न महिलांना पडला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अशीच एक घटना शिर्डीत नुकतीच घडली असून या संदर्भात संगीता नानासाहेब अहिरे शिवाजी नगर, शिर्डी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,


दिनांक 03/06/2025 रोजी सकाळी 08/45 वा. चे सुमारास मी माझे राहते घराजवळ असणारे जुने झुलेलाल मंदीर परिसरातील वडाचे झाडाला पाणी देण्यासाठी व पुजा करण्यासाठी गेले होते.

तेव्हा मी झाडाला पाणी देवुन व पुजा करुन परत घरी पायी येत असतांना माझ्या जवळ एक अनोळखी अंदाजे वय 30 ते 35 वर्षे वयाचा इसम फोनवर बोलत बोलत माझ्याजवळ आला व हिंदी भाषेमध्ये मला म्हणाला की, मा जी थ्रीजी हॉटेल कहा पर है त्यावर मी त्याला म्हणले की मला माहिती नाही असे म्हणाले असता

माझे लक्ष दुसरीकडे गेल्याने त्याने माझ्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याचे मिनी गंठण ओरबडले.पैकी 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हे माझ्या साडीच्या पदराला आडकुन राहीले व उर्वरीत अंदाजे 8 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण हे बळजबरीने ओढुन, तोडुन घेवुन तो तेथुन पळुत जावुन रोडवर मोटार सायकलवर बसलेला दुस-या इसमच्या मोटार सायकलवर बसुन ते दोघे झुलेलाल चौकाकडे निघुन गेले.

त्यावेळी मोटार सायकल चालवित असलेल्या इसमाच्या अंगात सफेद चेक्स रंगाचा शर्ट व त्याच्या पाठीला लाल रंगाची सँग अडकवलेला होती व मागे बसलेल्या इसमाच्या अंगात फिकट तांबूस रंगाचा शर्ट‌होता. त्यांनी संगणमताने माझ्या गळ्यातील सुमारे पन्नास हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले आहे

अशा असल्याचे फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात त्यांनी दाखल केल्या असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button