Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

जूने पदाधिकारी कायम ठेवत शिवसेनेत अनेकांना नव्याने नियुक्ती

शिवसेनेने जूने पदाधिकारी कायम ठेवत शिवसेनेत अनेकांना नव्याने नियुक्ती
शिर्डी- लोकसभा निवडणुकीनंतर राहाता विधानासभेत शिवसेना पक्षात अनेकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे या नियुक्ती जाहीर केल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जूने पदाधिकाऱ्यांना आहे त्याच जबाबदारी देत अनेकांची नव्याने नियुक्ती केली आहे. शाम गोसावी व रविंद्र वाघ यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तर सदाशिव गोंदकर व विश्वास त्रिभवन यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सागर बोठे यांचे तालुका प्रमुख पद कायम ठेवण्यात आले आहे.


किशोर तरटे, अंजाबापू जटाड व आशिष गाडेकर यांची उपतालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश जगताप यांची शिर्डी शहरप्रमुख म्हणून तर संतोष जाधव व अनिल पवार यांची उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. साई कार्ले यांची राहाता शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिर्डी शहर संघटक म्हणून हरीराम रहाणे तर शहर समन्वयक म्हणून सोमनाथ महाले व नानप सावंत्रे उपशहर प्रमुख अनिल पवार व संतोष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कोल्हार शहर प्रमुख पदी विशाल कणगरे यांची नियुक्ती करण्यात आली असून उपशहर प्रमुख पदी भरत जाधव व शुभम पोपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत.


या नव नियुक्तीबाबत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व माजी खासदार सदाशिव लोखंडे पक्ष निरीक्षक राजेद्र चौधरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून पक्ष वाढीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे अवहान देखील केली आहे. त्याच बरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते व नितिन औताडे, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, राजेंद्र देवकर, सुनिता शेळके यांनी देखील नवीन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button