पुनमसिंग कोंडीराम परदेशी वय 60 वर्षे व्यवसाय साईबाबा संस्थान (नोकरी) विक्री रा. लक्ष्मीवाडी, सावळीविहीर बुद्रुक ता. राहाता जि. अहिल्यानगर मी साईबाबा संस्थान प्रसादालयामध्ये कामाला आहे.
दि.27/05/2025 रोजी सकाळी 07/00 वाजणेचे सुमारास मी नेहमीप्रमाणे प्रसादालयात ड्युटीसाठी माझी मोटारसायकल नं. एम.एच-17, सी.ए.2405 हिचेवर आलो व नेहमीप्रमाणे प्रसादालया शेजारी शेडमध्ये माझी गाडी मोटारसायकलच्या पार्कीगमध्ये हॅण्डल लॉक करुन लावुन माझ्या कामासाठी गेलो.
त्यानंतर मी दुपारी 03/00 वा. चे. सुमारास माझी सुट्टी झाल्यावर मी माझे मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी गेलो असता मला माझी मोटारसायकल दिसुन आली नाही म्हणुन मी आजुबाजुचे परिसरात, शिर्डी गावात माझी चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा आतापावेतो शोध घेतला असता माझी मोटार सायकल मिळुन आली नाही.
म्हणुन माझी खात्री झाली की माझी मोटार सायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे विशेष म्हणजे फिर्यादी हा संस्थान मध्ये कामाला आहे कामावर आल्यानंतर त्याने प्रसादालयासमोर सुरक्षित असणाऱ्या शेडमध्ये लावलेली होती ती चोरी गेल्यानंतर त्याने संस्थान मध्ये
सीसीटीव्ही तपासण्यासाठी प्रयत्न केले परंतु संस्थान मधील कर्मचारी यांनी सांगितले कि त्यासाठी पोलीस स्टेशनचे पत्र लागेल अश्याच प्रकारे कामावर आलेल्या कर्मचारी यांच्या गाड्या सुरक्षित ठिकाणावरून चोरी जात असतील तर कामावर कशे यावे हा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांवर पडला आहे