Letest News
संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स...
क्राईम

आदिवासी कुटुंबावर अन्याय करणारे अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी शेवगाव पोलीसांच्या मेहरबानीने मोकाट

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव रोडवरील काटेवाडी जवळ आखेगाव-काटेवाडी रस्त्यावर एका अनुसूचित जमातीच्या इसमाला जातीवाचक शिवीगाळ करुन आणि त्याच्या पत्नीस बळजबरीने गाडीत बसवून पुढे नेऊन दूरवर सोडून दिला असल्याच्या प्रकाराचा गुन्हा दि.24 जानेवारी रोजी नोंदवून देखील आरोपी मोकाटप्रमाणे फिरत आहेत व पुन्हा त्रास देत आहेत तरीही पोलीसांकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने पोलीसांची संशयास्पद भूमिका वाटत असल्याने पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक यांनी या प्रकरणी लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा भविष्यात जिवाचे बरेवाईट झाल्यास सदरील आरोपी जबाबदार राहतील अशी मागणी पत्रकाद्वारे परमेश्वर भवार यांनी दिली आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आदिवासी समाज अशिक्षित अडाणी असल्याचा गैरफायदा काही गावातील लोक तसेच जातीवादी लोक करत असतात परंतू आता पोलीस प्रशासन देखील आदिवासी समाजावर अन्याय करतांना दिसत आहे. शेवगांव येथील पोलीस स्टेशन मध्ये दि.24/01/2024 रोजी आदिवासी कुटूंबाने फिर्यादी परमेश्वर माणिक भवार यांनी त्याच्यावर गुंड व्यक्ती नामे बाबासाहेब ज्ञानोबा बडे, विकास बडे, जनार्दन पालवे, दादासाहेब पालवे या सर्वांनी रस्त्यावर अडवून जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादी परमेश्वर भवार यांच्या पत्नीस जबरदस्तीने चारचाकी गाडीत टाकून घेवून जात धमकावत तुझ्या पत्नीला काय करतो बघ म्हणत दुर अंतरावर घेवून जात साळेगाव फाट्यावर नेऊन सोडल्याची तक्रार देवून देखील एक महिना होवून देखील शेवगांवचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मेहरबानीने सदर सर्व आरोपी मोकाट असून सर्व आरोपी हे फिर्यादीवर दबाव टाकत असून पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहेत त्यामुळे सदर प्रकरणात एवढा गंभीर गुन्हा दाखल होवून देखील पोलीस प्रशासनाच्या असा भोंगळ कारभाराकडे सर्व नगर जिल्ह्याचे लक्ष लागले असून लवकरच फिर्यादी व त्याचे कुटूंब आरोपीस तात्काळ अटक करुन न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब नगर येथे आमरण उपोषणास बसणार आहोत आणि भविष्यात जर आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास उपरोक्त आरोपी जबाबदार राहतील असे श्री.भवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button