Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
शिर्डी

शिर्डीत श्री साई सच्चरित्र पारायणास  मोठ्या उत्साहाने  सुरुवात 

शिर्डी:-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोमवार दिनांक ०५ ऑगस्‍ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्‍ट २०२४ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून, या पारायण सोहळ्यात अंदाजे सुमारे ०५ हजाराहुन अधिक महिला व ०१ हजार ५०० हुन अधिक पुरुष असे सुमारे ०६ हजार ५०० पेक्षा अधिक पारायणा‍र्थींनी सहभाग घेतला.
आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्‍या श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे साईआश्रम भक्‍तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी श्रींची प्रतिमा, व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी नाट्य रसिक मंच, शिर्डी यांचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
गेट नंबर ०४ पासून ते पारायण मंडपापर्यंत १० पुरूष लकी ड्रॉ भाग्‍यवान साईभक्‍तांनी टप्‍या-टप्‍याने श्री साईबाबांची तसबीर घेऊन तर प्रत्‍येकी २० महिला लकी ड्रॉ भाग्‍यवान साईभक्‍तांनी टप्‍या-टप्‍याने श्री साईबाबांची पोथी व कलश घेऊन सहभाग नोंदविला. यावेळी प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, नाटय रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्‍थानचे कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
मिरवणूक पारायण मंडपात आल्‍यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ग्रंथ व कलश पूजन करुन, श्री साईसच्‍चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्‍यात आला. सकाळी ०७.०० ते ११.३० पुरूष वाचक व दुपारी ०१.०० ते ०५.३० महिला वाचक यांचे यावेळेत श्री साईसच्‍चरिताचे वाचन करण्‍यात आले. दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत अनहद ग्रुप, नाशिक यांचा संगीतमय भक्‍तीसंगीत कार्यक्रम, सायंकाळी ०५.३० ते ०६.३० यावेळेत श्री. ज्ञानदेव आबा गोंदकर यांचा समाधीनंतर श्री साईबाबांचे साक्षात्‍कार या विषयावर प्रवचण व रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. सुजाताताई पा. कदम चाळाखेकर, नांदेड यांचा किर्तनाचा कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button