Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
Blog

साई भक्ताचे शिर्डीत एटीएम कार्ड हात चलाखीने बदलून अठरा हजार रुपये काढून केली फसवणूक!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साई दर्शनाला आलेल्या छत्तीसगड राज्यातील साईभक्तांचे एटीएम कार्ड हातचलाखी करून बदलून अठरा हजार रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बिलासपुर छत्तीसगड येथील विलास ठाकूर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,आपण छत्तीसगड राज्यातील बिलासपुर येथील
आपल्या पत्नी व मुलांसह शिर्डी येथे सहा डिसेंबर 2023 रोजी आलो होतो. सात डिसेंबर रोजी पहाटे रेल्वे स्टेशनला उतरून शिर्डी साई आश्रम पाचशे रूम येथे जाऊन रूम बुक केली व तेथून श्री साई मंदिरात दर्शन घेऊन आम्ही परत आलो. माझ्याकडे रोख रक्कम कमी असल्यामुळे माझी पत्नी प्रीती राणी हिचे स्टेट बँक एटीएम कार्ड घेऊन आम्ही पैसे काढण्यासाठी शिर्डी साई आश्रम पाचशे रूम समोरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मध्ये गेलो. तेव्हा मी पैसे काढत असताना एक अनोळखी ईसम मला पैसे काढण्यासाठी मदत करीत होता. पण पैसे निघाले नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तेव्हा मी माझ्याकडे असलेले एटीएम कार्ड पाहिले असता ते माझ्या पत्नीच्या नावाचे नसल्याचे दिसले .सदर एटीएम हे शरद अशोक गायकर या नावाचे होते .तेव्हा मला पैसे काढण्यासाठी मदत करणारा इसम याला शेजारी पाहिले असता तो दिसून आला नाही. तेव्हा माझी खात्री झाली की मला मदत करणारा अनोळखी ईसम यांनी हात चलाखी करून माझ्या पत्नीच्या जवळ असलेले एटीएम कार्ड लबाडीचे इराद्याने चोरून घेऊन गेला आहे. त्यानंतर या एटीएम मधून अठरा हजार रुपये काढले गेले.व आमची फसवणूक झाली. अशा आशयाची फिर्याद त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 10 79/2023 नुसार भादवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button