Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ

शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी तालुक्यातील निमगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्याच्या कारणावरून तिघांनी एका वाहनचालकावर व त्याच्या मित्रावर बीअरच्या बाटल्यांनी सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निसार कादर शेख (वय ४२, रा. स्वामी विवेकानंदनगर, शिर्डी) हे मजुरी तसेच स्वतःची इटिंगा गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. १ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ते त्यांचा मित्र विशाल बाबासाहेब पटेकर यांच्यासमवेत कामानिमित्त निमगावकडे जात होते. त्यावेळी विशाल पटेकर हे वाहन चालवत होते, तर निसार शेख हे शेजारील सीटवर बसले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दरम्यान, बी.एम. बीअर शॉपी, निमगाव समोरील इंडिया ए-वन एटीएमजवळ विशाल पटेकर हे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता, निसार शेख हे वाहनात बसून त्यांची वाट पाहत होते. याचवेळी स्कुटीवरून आलेल्या तिघांनी अचानक गाडीसमोर थांबत वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी प्रथम वाहनाच्या दरवाज्याला लाथ मारत “हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?” अशी अरेरावी केली.
यानंतर संशयित संदीप मते, अमोल आप्पासाहेब मते उर्फ बन्या व सोमनाथ गायकर यांनी हातातील स्टुबर बीअरच्या काचेच्या बाटल्यांनी निसार शेख यांच्या डोक्यावर, डोळ्याच्या उजव्या भुवईवर तसेच शरीरावर बेदम मारहाण केली. काचेच्या बाटल्यांच्या प्रहारामुळे निसार शेख यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ते जागीच बेशुद्ध पडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


आपल्या मित्राला वाचविण्यासाठी धावून आलेल्या विशाल पटेकर यांनाही आरोपींनी काचेच्या बाटल्यांनी मारहाण केली. दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत असताना आरोपींनी “तुम्हाला काय करायचे ते करा” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
या हल्ल्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी प्रथम श्री साईनाथ हॉस्पिटल, शिर्डी येथे नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले. तेथे सीटी स्कॅनसह वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोकमठाण येथील संत जनार्दन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.



निमगाव परिसरात वाढती दादागिरी चिंतेचा विषय
किरकोळ कारणांवरून काचेच्या बाटल्यांनी हल्ले, दमदाटी व दादागिरीच्या घटना वाढत असल्याने निमगाव परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button