Letest News
पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये एक कोटी रुपयाचे थुलियम लेजर मशिनचे लोकार्पण…

रुग्‍णसेवा हिच ईश्‍वरसेवा” या श्री साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्‍थानने श्री साईनाथ रुग्‍णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरु केले. श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत उपचार केले जातात तर श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये अत्‍यल्‍प दरात तसेच शासनाच्‍या योजनेतुन मोफत उपचार दिले जातात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये कार्डीयाक सर्जरी न्‍युरो, युरो, जनरल सर्जरी, आर्थो सर्जरी, डेंटल सर्जरी या अशा विभागांच्‍या विविध शस्‍त्रक्रिया होतात. अशा शस्‍त्रक्रियेसाठी मोठया प्रमाणात अद्यावत, अत्‍याधुनिक उपकरणांची आवश्‍यकता असते. त्‍याचाच भाग म्‍हणुन

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये युरो शस्‍त्रक्रियेसाठी दि. ३१ ऑक्‍टोबर २०२४ रोजी दुपारी ११.०० वा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से) यांचे हस्‍ते एक कोटी रुपयाचे थुलियम लेजर मशिनचे लोकार्पण करण्‍यात आले.


या मशिनमुळे युरो सर्जरीच्‍या ( Kidney Stone; Ureteric Stone; Urinary Bladder Stone) या सारख्‍या शस्‍त्रक्रिया अत्‍याधुनिक पद्धतीने कमी वेळेत करण्‍यास मदत होणार आहे तसेच किडनीमध्‍ये कुठलेही छिद्र न करता Kidney Stone च्‍या शस्‍त्रक्रिया सहजतेने करणे शक्‍य होणार आहे. त्‍यामुळे येथे येणा-या गरीब व गरजु रुग्‍णांना पुणे, मुंबई येथे या शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी जाण्‍याची आवश्‍यकता भासणार नाही तसेच अत्‍याधुनिक पद्धतीने कमी दरात उपचार होणार असल्‍याकारणाने रुग्‍णांची मोठी सोय होणार आहे.


यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.दिपक कांदळकर, जनरल सर्जन डॉ रंजित भोजने, डॉ. अजिंक्‍य पानगव्‍हाणे, युरो सर्जन डॉ. वैभव कांबळे, डॉ.योगेश तोरकडी, मेक्झिलोफेशिअल सर्जन, डॉ. किरण खांदे, भुलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे, डॉ. निहार जोशी, डॉ. गायत्रीलक्ष्‍मी नागपुरे प्र.अधिसेविका निशा बारसे, जनसंपर्क अधिकारी(रुग्‍णालये) श्री सुरेश टोलमारे तसेच जनरल सर्जरी ऑपरेशन थिएटरमधील सर्व कर्मचारी उपस्‍थीत होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button