Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
क्राईमशिर्डी

शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करांनी पळवला 

शिर्डीचे येथील ग्राम महसूल अधिकारी सतीश भाऊसाहेब गायके यांना धक्काबुक्की करून मुरूम भरलेला ट्रक दादागिरी करून पळवला ह्याबाबत ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे त्यात ते म्हटले आहे कि

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मी दिनांक 29/07/2025 रोजी सकाळी 10/00 वाजण्याचे सुमारास माझ्या मोटार सायकलवर कार्यालयीन कामानिमित्त  वेस-सोयेगांव रांजणगांव रोडने जात असतांना वेस गावांत मारुती मंदीराचे जवळ, रोडवर चौफुलीचे ठिकाणी एक विना नंबरचा पांढ-या व निळसर रंगाचा डंपर हा वेस गावाकडे येत असतांना दिसल्याने त्यास थांबवुन त्याच्याकडे मुरुम वाहतुक करण्याचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारणा केली असता

त्याने परवाना नसल्याचे सांगितले व त्यानंतर त्या ठिकाणी लोकं आले त्यापैकी एक इसम आला व मला म्हणाला की मी नितीश बोरुडे असुन हा डंपर माझ्या
मालकीचा आहे.

तु बाजुला हो असे म्हणाला असता मी त्यांना म्हणालो की, सदर डंपर गाडीवर कारवाई करायची आहे गाडीमध्ये चोरीचा मुरुम आहे. तेव्हा नितीश बोरुडे याने माझी शर्टची कॉलर पकडुन हाताने कवळी मारुन धरुन ठेवले त्यावेळी नितीश बोरुडे याने माझा मोबाईल खिशातुन काढुन बाजुला टाकला व ढंपरवरील ड्रायव्हर संतोष अहिरे याने मला धक्काबुक्की केली.

त्यावेळी जमलेल्या इसमांपैकी एक अनोळखी इसमास नितीश बोरुडे याने डंपर चालु करुन घेवुन जाण्यास सांगितले असता तो घेवुन गेला. म्हणुन माझी 1) नितीश बोरुडे पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही 2) ढंपरवरील ड्रायव्हर संतोष अहिरे पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही व 3) ढंपर घेवुन जाणारा अज्ञात इसम नाव व पत्ता माहीत नाही

यांनी संगनमत करुन मी करत असलेले शासकीय कर्तव्य करण्यापासुन धाकाने परावृत्त करुन मला धक्काबुक्की केली व शासनाची परवानगी न घेता मुरुमाची चोरी करुन तो डंपरमधुन वाहतुक करुन घेवुन गेला म्हणून माझी वरील इसमांविरुध्द शासनातर्फे कायदेशिर फिर्याद आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button