Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
राजकीयशिर्डी

“शिर्डीत विरोधकांचा आवाज गप्प… लोकशाहीत समतोल हरवलाय!” — विराट पुरोहितांचा जोरदार प्रहार

शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यापारी क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत असलेले श्री. बाबू शिवराम पुरोहित (बाबूजी) हे नाव आज परिवर्तन, संघर्ष आणि जनतेसाठी सातत्याने झटणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. गरीब आणि सामान्य कुटुंबातून आलेले बाबूजी हे त्यांच्या जिद्दीच्या बळावर जनतेच्या मनात आपली ठसठशीत ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

sai nirman
जाहिरात

🎓 शिक्षणातून घडलेला नेतृत्व प्रवास

बाबूजी यांनी एम.ए. (राज्यशास्त्र) आणि डिप्लोमा इन जर्नालिझम पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि तेथून त्यांच्या समाजाभिमुख प्रवासाची सुरूवात झाली.
पत्रकारितेच्या काळात त्यांनी मा. मंत्री प्रमोदजी महाजन यांच्यासोबत तरुण भारत या वृत्तपत्रात कार्य केलं. या काळातच मा. आ. गोपीनाथ मुंडे व मा. खा. गिरीश बापट यांच्याशी घट्ट मैत्री झाली आणि सर्वांनी मिळून प्रतिकूल काळात कार्य केलं.

DN SPORTS

🔸 राजकारणात कार्यकर्त्यापासून संघटनेपर्यंतचा प्रवास

पत्रकारिता सोडून बाबूजी पूर्णवेळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यात झोकून दिले. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आणि “ग्रामपंचायत जनसंघ” या नावाने निवडणुकीत झेंडा फडकवला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील दुसरी यशस्वी जनसंघ ग्रामपंचायत घडवण्याचं श्रेय बाबूजींना मिळालं.

🔹 संघर्षमय आयुष्य — लोकशाही रक्षणासाठी तुरुंगवास

आपल्या विचारांसाठी ठाम उभं राहणं हीच बाबूजींची ओळख. आणीबाणीच्या काळात दीड वर्ष तुरुंगवास सोसून त्यांनी लोकशाहीचे रक्षण केले. स्व. सूर्यभानजी वहाडणे पाटील यांच्या सहकारी म्हणून आणि काही काळ स्वीय सहाय्यक म्हणून विना वेतन कार्य केलं.

🏛️ सामान्य माणसाच्या न्यायासाठी सतत लढा

kamlakar

शिर्डीत सामान्य दुकानदारांच्या स्वावलंबनासाठी बाबूजींनी सलग ३५ वर्ष संघर्ष केला. सावळीविहीर लक्ष्मीवाडीतील साखर कारखाना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
लक्ष्मीनगर मधील गरीब जनतेचे पुनर्वसन करून त्यांना स्थैर्य व सन्मान दिला. छोट्या व्यावसायिकांना घर आणि व्यवसायाचे संरक्षण देणारा एकमेव आधारवड म्हणून बाबूजी ओळखले जातात.

⚔️ २००४ मधील शिर्डी दंगल — निर्भय नेतृत्वाची कसोटी

२००४ साली शिर्डीतील दुकानदारांच्या प्रश्नासाठी बाबूजी प्रशासनाच्या दादागिरीविरोधात ठामपणे उभे राहिले. शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्यावर व मा. खा. भानुदास मुरकुटे यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.
प्रशासनाने त्यांना मुख्य आरोपी ठरवलं आणि ४ महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला. मात्र जवळपास १८ वर्षे चाललेल्या खटल्यानंतर बाबूजी आणि सहकारी निर्दोष मुक्त झाले — आणि सत्याचा विजय झाला.

🌿 विचार, निष्ठा आणि लोकाभिमुखता — हीच ओळख

बाबूजी पुरोहित हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाहीत, तर ते एक विचारवंत, संघटक आणि जनतेचे नेते आहेत. मा. उत्तमराव पाटील यांचं पितृतुल्य मार्गदर्शन आणि मा. वसंतराव भागवत यांचे राजकीय गुरुत्व त्यांना लाभले.
रामजन्मभूमी आंदोलनापासून ते शिर्डीतील दुकानदारांच्या हक्कांपर्यंत, त्यांनी प्रत्येक लढाईत जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं आहे.


🟢 आज शिर्डीत नव्या बदलाची चाहूल लागली आहे…
जनतेत पुन्हा एकदा बाबूजी पुरोहितांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण होत आहे.
त्यांच्या कार्याची पायाभरणी म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि पारदर्शकता — आणि हेच गुण त्यांना वेगळं ठरवतात.

संघ संस्कारातून घडलेले नेतृत्व — विराट पुरोहित!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून प्रेरित तरुण नेतृत्वाची नवी ओळख


शिर्डीत सध्या नव्या पिढीचं नेतृत्व घडताना दिसतंय आणि त्या नेतृत्वाच्या रांगेत ठळकपणे नाव घेतलं जातं ते विराट पुरोहित यांचं. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहिलेल्या विराट पुरोहित यांनी आपल्या संघ संस्कार, शिस्त आणि लोकाभिमुखतेच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.


💪 व्यायामाची आवड आणि शरीरसौष्ठवात उल्लेखनीय कामगिरी

लहानपणापासूनच व्यायामाची आवड असलेल्या विराट पुरोहित यांनी तरुण वयातच शरीरसौष्ठव क्षेत्रात आपलं नाव कमावलं. “ज्युनिअर नाशिकश्री” आणि “ओपन नाशिकश्री” हे दोन मानाचे पुरस्कार त्यांनी एकाच वेळी पटकावले — जे अत्यंत दुर्मीळ यश मानले जाते.
याच बळावर त्यांनी ज्युनिअर आणि ओपन महाराष्ट्र स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या जिल्ह्याचा सन्मान उंचावला.


🎓 शिस्तबद्ध शिक्षण आणि देशाभिमानाचं संस्कारस्थान — भौसला मिलिटरी स्कूल

विराट पुरोहित यांनी आपलं शिक्षण नाशिकच्या भौसला मिलिटरी स्कूल या प्रसिद्ध संस्थेतून पूर्ण केलं, जी संस्था देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे संस्कार देण्यासाठी ओळखली जाते.
त्यानंतर त्यांनी M.Sc. (Defence Studies) ही पदवी पूर्ण करत देशरक्षण आणि संघटनशास्त्राचं सखोल ज्ञान मिळवलं.


🕊️ संघ कार्यात सातत्य आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये कसून काम

संघाच्या विचारांशी बालपणापासून जोडले गेलेले विराट पुरोहित यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रचारक म्हणून त्यांनी संघाचे कार्य गावागावात पोहोचवले. अहिल्यानगर जिल्हा तसेच प्रांतस्तरावर त्यांनी विविध जबाबदाऱ्यांमध्ये काम करून संघटन, नेतृत्व आणि समर्पणाचा उत्कृष्ट नमुना घालून दिला.


🌿 संस्कार, संघटन आणि सेवा — हीच ओळख

विराट पुरोहित यांचे आयुष्य म्हणजे संघ संस्कारांची प्रचीती आणि कार्यकर्त्याच्या वृत्तीची प्रामाणिकता.
स्वतःच्या क्षमतांचा उपयोग समाजकार्यासाठी करणे, शिस्तबद्धता आणि सेवाभाव जपणे हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे.

त्यांच्या वाटचालीतून आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असून, शिर्डीत एक संघटनशील, देशाभिमानी आणि विचारवंत नेतृत्व म्हणून विराट पुरोहित उदयास येत आहेत. आजच्या बैठकीत गणेश वाघाचौरे
साईधन कुलकर्णी

रवींद्र कोलकर
रोहित सोळंकी
आकाश त्रिपाठी
युवराज निंबाळकर गणेश मिसाळ राजेंद्र पांचाल महेश बाविस्कर दीपक भांड आदी आवर्जून उपस्तिथ होते.


🟢 “संघटनातून शक्ती, शिस्तीतून सामर्थ्य आणि सेवेतून समाधान —
हीच आमची वाटचाल” — विराट पुरोहित

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button