Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण

शिर्डी :
देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री साईबाबांच्या चरणी भक्त आपल्या कुवतीनुसार विविध प्रकारचे दान अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पावन पर्वावर अशीच अढळ श्रद्धा आणि भक्तीची सुवर्ण साक्ष पाहायला मिळाली.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी, दि. २८ जुलै २०२६ रोजी, आंध्र प्रदेशातील एलुरु येथील दानशूर साईभक्त श्री. एम. श्रीनिवास राव यांनी श्री साईबाबांच्या चरणी ६२९ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. \

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या सुवर्ण मुकुटाचे देणगी मूल्य सुमारे ₹८२ लाख ३९ हजार २७१ असून, ही देणगी श्री साईबाबांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेचे आणि निस्सीम भक्तीचे जिवंत प्रतीक ठरली आहे.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साईभक्त श्री. एम. श्रीनिवास राव यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
श्री साईबाबांनी दिलेला “श्रद्धा आणि सबुरी” हा अमूल्य संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देत आहे. त्याच संदेशाने प्रेरित होऊन भाविक श्रींच्या चरणी केवळ सुवर्ण-रौप्य नव्हे, तर आपल्या मनातील अपार श्रद्धा, विश्वास आणि समर्पण अर्पण करत असतात. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर अर्पण करण्यात आलेला हा सुवर्ण मुकुटही अशाच निस्वार्थ भक्तीचा आणि श्री साईबाबांवरील अखंड विश्वासाचा तेजस्वी आविष्कार ठरला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button