Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

राहाता : अवैध धंद्यांचे अभयारण्य! तरुणाची हत्या-आत्महत्येचा प्रयत्न दाबला ? तरीही बिंगो–जुगार गुटखा तस्करी राजरोस सुरूच

राहाता (प्रतिनिधी) – राहाता शहरात अवैध व्यवसायांनी अक्षरशः कळस गाठला असून, त्यातून गुन्हेगारीला खुले आम खतपाणी घातले जात आहे. या अवैध धंद्यांचाच परिणाम म्हणून सचिन गिधे या तरुणाची निर्घृण हत्या झाली. मात्र, ही घटना दाबण्याचे अनेक प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आणि अखेर आरोपींना अटक करण्यात आली. मात्र हा केवळ एक भाग असून, राहात्यातील गुन्हेगारीचे मुळ अजूनही तसेच कायम आहे.


बिंगो अड्ड्यावर कहीं दिवसांपूर्वी लाख हरला, फिट आली, आत्महत्येचा प्रयत्न – प्रकरण दाबले
राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात असलेल्या बिंगो अड्यावर बनसोडे नावाच्या व्यक्तीने तब्बल १ लाख रुपये हरल्याने त्याला तिथेच फिट आली. त्यानंतर to शुद्धीवर आल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले, मात्र हे संपूर्ण प्रकरण त्याच ठिकाणी दाबण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.


हत्या झाली, पण आरोपींचे अवैध धंदे सुरूच!
एका तरुणाची हत्या होऊनही संबंधित गुन्हेगारांचे बिंगो, जुगार, मटका, गुटखा तस्करी हे अवैध व्यवसाय आजही राजरोसपणे सुरू आहेत, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.
दैनिक साई दर्शनने वेळोवेळी या गंभीर बाबी जनतेसमोर तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या,

मात्र स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही.


राहाता पोलिसांविरोधात थेट महासंचालकांकडे तक्रार
अखेर या गंभीर दुर्लक्षामुळे राहाता पोलिसांविरोधात राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली.
त्यावर माननीय पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे सी.पी. यांना चौकशीचे आदेश दिले.
असे असूनही अवैध धंदे सुरूच – राहाता शहरात बिंगो, जुगार, मटका आणि गुटखा तस्करी आजही खुलेआम सुरू असल्याने,


👉 राहाता पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
👉 गुन्हेगारांना अभय देणारे कोण?
👉 आदेश कागदावरच राहणार का?
असे थेट सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहेत.
राहाता शहर कायद्याच्या राज्यात आहे की गुन्हेगारांच्या छत्राखाली?
हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिक विचारत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button