
राहाता शहराला बालपणापासून पाहत आलो… समाजकार्याची ओढ मनात होती. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, त्यांची व्यथा, त्यांचे दैनंदिन संघर्ष — हे सर्व जवळून पाहिलं. पण या शहरात गेल्या अनेक वर्षांत जे घडत आलं आहे, ते प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात खुपणारं आणि मनाला चीड आणणारं आहे.
● सत्ताधारी-विरोधकांचा नाटकबाजपणा – कुणाचीही नागरिकांच्या वेदनेकडे नजर नाही!
राहाता शहरातील राजकारण म्हणजे एक गलिच्छ खेळ!
इकडच्या बाकावरून तिकडे… तिकडच्या बाकावरून पुन्हा इकडे…
तिकीट मिळालं की सगळे एकत्र!
उमेदवारी मिळाली की सगळे घोटाळ्याची साखरपेरणी करत पुन्हा एकत्र!
नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत सत्ता मिळवणारे हे सारे राजकारणी चौरंगावर एकमेकांचे खांदे धुवून बसतात.
पण जेव्हा कोविडने शहर उध्वस्त होत होतं, जेव्हा रस्ते मोडकळीस होते, गटारी तुंबल्या होत्या, आरोग्य व्यवस्था कोलमडली होती — तेव्हा हेच लोक कुठे होते?
एकही नेता नागरिकांच्या पाठीशी नव्हता!
● कोविड काळातील भयानक वास्तव – हॉस्पिटल्सनेच केले सर्वात जास्त शोषण
ऍड. रामनाथ सादाफळ म्हणाले–
“कोविड काळात सर्वसामान्य नागरिकांना कोणीच विचारलं नाही. उलट, काही खासगी हॉस्पिटल्सने दोन-दोन लाखांना इंजेक्शन विकून नागरिकांना अक्षरशः लुटलं! एका साध्या माणसाचे, एका गरीब कुटुंबाचे कंबरडे मोडणारे शोषण या शहरात घडले. पण कोणत्या नेत्याने आवाज उठवला? कोण पुढे आला? कोणीच नाही!”
● दारूच्या पार्ट्या, नोटांची उधळण आणि तरुणांचा वापर – निवडणूक आल्यानंतरच सेवा!
राहाता शहरातील अनेक पक्ष निवडणुकीच्या काळात दारू-पार्टी, गैरप्रकार आणि पैशांची उधळण करून युवकांना भडकावतात.
एखाद्या रात्रीची पार्टी देऊन मत मागतात…
आणि निवडणूक झाल्यानंतर तेच तरुण पुन्हा दोन वर्षे बेकारच राहतात.
ना रोजगार, ना शिक्षण, ना आरोग्य सुविधा —
नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष!
● सर्वसामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण – आम आदमी पार्टीचा उदय
राहाता शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या वेदना, त्यांच्या हक्कांसाठी बोलणारा कोणी नसल्याचे बघून, ऍडव्होकेट रामनाथ सादाफळ यांनी आम आदमी पार्टीचे स्थानिक संघटन उभारण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणाले—
“या शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि स्वच्छ राजकारणाची सुरुवात करण्यासाठी मी आम आदमी पार्टीची स्थापना केली. आता राहाता शहरात बदल होणारच!”
● नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पार्टीचा चेहरा – ऍड. रामनाथ सादाफळ
राहाता शहराला भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त आणि स्वच्छ प्रशासन देण्याचा शब्द
आम आदमी पार्टी आणि ऍड. सादाफळ यांनी दिला आहे.
शहरातील रस्ते, आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि रोजगारासंबंधी सविस्तर आराखडा लवकरच जाहीर केला जाणार आहे.