Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी गावठी कट्यासह एकास घेतले ताब्यात 

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

दिनांक 27/03/2025 रोजीचे 18/30 वा. ते दिनांक 28/03/2025 रोजीचे 02/00 वा. चे दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. कोंबींग ऑपरेशन दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे एक कारवाई करण्यात आली असुन आरोपी नामे महेश गोरख बोराडे, रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता

DN SPORTS

kamlakar

याचेकडुन 15,000/- रूपये किमतीचा गावठी कट्टा 1000/- रूपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे तसेच 2,00,000/- एक विना नंबरची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट क्लासिक मोटार सायकल असे जप्त करण्यात आले आहे.  मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे हद्दपार कारवाई इसम नामे सुदाम साहेबराव काळे, रा. कालिकानगर शिर्डी ता. राहाता

याच्यावर करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 291/2025 भा.न्या.सं. 331(4), 305(अ) घरफोडीमध्ये आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे 1. दुर्गेश नंदलाल कोडीले रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता 2. संतोष उर्फ गणेश शंकर शिंदे रा. बाजारतळ, शिर्डी ता. राहाता यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.  

मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे – 4 कारवाया करण्यात आले आहे.  महाराष्ट्रा दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे – 3 कारवाया करण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र जुगार अधिनियम 12 (अ) प्रमाणे 1 कारवाई करण्यात आली आहे.  ड्रंक अँड ड्राईव्हचे – 5 केसेस करण्यात आलेल्या आहेत 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button