Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
राजकीयशिर्डी

२६ जानेवारीच्या सुट्ट्यांत साईनगरीत भक्तीचा महासागर शिर्डी दुमदुमली

शिर्डी, दि. _ :
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी तसेच सलग सुट्ट्यांचा लाभ घेत देशाच्या विविध भागांतून साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून साईनगरीत भाविकांची गर्दी वाढत असून मंदिर परिसर, दर्शन रांगा, रस्ते, बाजारपेठा तसेच बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाल्याचे चित्र आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे. दर्शन रांगांचे योग्य नियोजन, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, वैद्यकीय सेवा तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता सुरळीत दर्शन होत आहे.


याचबरोबर शिर्डी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसर, मुख्य चौक, पार्किंग स्थळे, बसस्थानक, रेल्वे स्थानक व शहरातील प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात आले असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात आहे.


भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शिर्डीतील हॉटेल, लॉजिंग, भोजनालये, फुलविक्रेते, प्रसाद विक्रेते, दुकानदार तसेच इतर व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक दिवसांनंतर मिळालेल्या या गर्दीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.


संस्थान व पोलीस प्रशासनाच्या उत्तम समन्वयामुळे साईनगरीत शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरण असून भाविकांनीही व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले आहे. आगामी काही दिवसांतही भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत बोलताना नूतन नगराध्यक्षा जयश्री ताई थोरात यांनी सांगितले की,
“२६ जानेवारी व सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या कुठल्याही साईभक्ताला शहरात कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था तसेच वाहतूक नियोजनाबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. साईभक्तांची सेवा हीच आमची प्राथमिकता आहे.”


नगरपरिषद, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय असून भाविकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button