Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
अ.नगरराजकीय

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न

अहिल्यानगर दि.१८-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय सरमिसळ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar
 या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी  उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मनुष्यबळ व्यवस्थापन समन्वयक अतुल चोरमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर उपस्थित होते.










अहिल्यानगर  जिल्ह्यांतर्गत बारा विधानसभा क्षेत्रासाठी ४ हजार ९३२ मतदान केंद्राध्यक्ष, ४ हजार ७६१ प्रथम मतदान अधिकारी तसेच ४ हजार ९०१ पुरुष व ६ हजार २१५ महिला अशा इतर मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.











 सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिले प्रशिक्षण देण्यात येणार आहे

आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

 अहिल्यानगर दि. १८- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या ४८ तासामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक  ठिकाणे तसेच खाजगी मालमत्तेवरील भित्तीपत्रके, घोषणा फलक, रंगविलेल्या जाहिराती, कोनशिला, झेंडे काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.









 जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसरातील ११ हजार ६४१,  सार्वजनिक ठिकाणच्या ९ हजार ५०२ तर खाजगी मालमत्तेवरील ३ हजार ८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे. 











 अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.














 संगमनेर मतदारसंघ कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ८८, खाजगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ६४१, खाजगी मालमत्तेवरील ३५१, कोपरगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ९५४, सार्वजनिक ठिकाण ६१९, खाजगी मालमत्तेवरील ३०९, श्रीरामपूर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १३१, सार्वजनिक ठिकाण १ हजार ५५० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.













 नेवासा मतदारसंघ कार्यालय परिसर ३२४, सार्वजनिक ठिकाण ५७७, शेवगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ८५४, सार्वजनिक ठिकाण ९३७, खाजगी मालमत्तेवरील १ हजार ७२३, राहुरी मतदारसंघ कार्यालय परिसर २५४, सार्वजनिक ठिकाण १४१, खाजगी मालमत्तेवरील २१, पारनेर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १२३, सार्वजनिक ठिकाण ९७८, खाजगी मालमत्तेवरील ४९५ जाहिराती काढण्यात आल्या.


















अहमदनगर शहर मतदारसंघ कार्यालय परिसर २८६, सार्वजनिक ठिकाण ४१६, खाजगी मालमत्तेवरील ४१, श्रीगोंदा मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार २९४, सार्वजनिक ठिकाण ८०२, खाजगी मालमत्तेवरील ३११ तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८२५, सार्वजनिक ठिकाणच्या ३६२ जाहिराती काढण्यात आल्या असल्याचे आचारसंहिता कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button