Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीजवळील सावळी विहीर येथील साई जतीन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मध्यरात्री धडक कारवाई करत केंद्राचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान दूध संकलन, गुणवत्ता नियंत्रण, प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि नोंदवही व्यवस्थापनात गंभीर अनियमितता आढळून आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
एफडीएच्या तपासणीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांत तब्बल २२ दूध टँकर विविध कारणांमुळे रिजेक्ट करण्यात आले होते. मात्र या रिजेक्ट टँकरांची अधिकृत नोंदच उपलब्ध नसल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर रिजेक्ट झालेले दूध नेमके कुठे गेले, त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली, याबाबत कोणतीही माहिती केंद्राकडे नसल्याने संपूर्ण गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासणीदरम्यान दूध संकलन रजिस्टर, दूध डिस्पॅच नोंदी, प्रयोगशाळेतील चाचण्यांची माहिती तसेच रिजेक्ट टँकरांच्या नोंदी अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. अन्नसुरक्षा नियमांनुसार अशा सर्व नोंदी अद्ययावत ठेवणे बंधनकारक असताना केंद्राकडून नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुधाचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या अहवालात भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईनंतर शिर्डी परिसरातील दूध संकलन व वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. एकाच केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळत असेल, तर इतर दूध डेअरी आणि संकलन केंद्रांची स्थिती काय आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


उर्वरित डेअरींवर कधी कारवाई?
सावळी विहीर येथील कारवाईनंतर आता शिर्डी, राहाता आणि परिसरातील सर्व दूध डेअरी, संकलन केंद्रे व दूध प्रक्रिया प्रकल्पांची अचानक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. दूध हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ असल्याने त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, एफडीएची पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button