
कोळपेवाडी येथील सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,आयुर्वेद कॉलेज,आणि जवळके ग्रामपंचायत याच्या संयुक्त विद्यमाने जवळके हनुमान मंदिराच्या सभागृहात मोफत वैद्यकीय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याचा जवळके आणि परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यातील नागरिकांना मोफत शिक्षण,आरोग्य हा नागरिकांचा अधिकार असून त्यासोबत चांगले रस्ते वीज,पिण्याचे पाणी हा सगळ्याचा माफक दरात अधिकार आहे.त्यासाठी सेवाभावी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या नागरिकांना सेवा देण्याचे त्यांचे काम आहे.या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कोळपेवाडी येथील सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,आयुर्वेद कॉलेज,आणि जवळके ग्रामपंचायत याच्या संयुक्त विद्यमाने जवळके हनुमान मंदिराच्या सभागृहात मोफत वैद्यकीय शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित केले होते.
त्यावेळी त्याचे उद्घाटन जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात व सदस्या इंदुबाई नवनाथ शिंदे यांच्या हस्ते तर शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख व पत्रकार नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,नवनाथ शिंदे,ग्रामविकास अधिकारी सतीश दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळपेवाडी नॉलेज सिटीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश कोळपे यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी विपणन अधिकारी विक्रम कटकाळे,शहानवाज शहा,प्रसिध्दी प्रमुख रवींद्र निकम,मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र निकम,वैद्यकीय अधिकारी डॉ.हिना शेख,सहाय्यक वैद्यकीय अधिकारी वैजयंती चव्हाण,नर्सिंग विभाग प्रमुख योगिता आयनोर,वैजयंती चव्हाण,महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य कार्यकर्ते दत्तात्रय जगताप,सदस्य भाऊसाहेब थोरात,वनिता रखमा वाकचौरे,भिवराज थोरात,विठ्ठल गणपत थोरात,कानिफनाथ थोरात,रखमा वाकचौरे,विजय शिंदे,लक्ष्मण थोरात,गणेश थोरात,गणेश कानडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सर्वरोग निदान शिबिरात २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे तर २३ हून अधिक रुग्णांवर सुप्रसाद मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोळपेवाडी येथे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र निकम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्र्वर दिंडीचे…या ठिकाणाहून प्रस्थान
वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथील रोकडेश्वर महाराज मंदिर ते नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्ती महाराज यांचे समाधी मंदिर या दरम्यान सोमवार दि.१७ जानेवारी सकाळी १० वाजता ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती अड्.प्रमोद जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले आहे.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन २८ कि.मी.अंतरावर पश्चिमस्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसलेले आहे.या जवळच ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला.त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे.
संत निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते ती.२३ जुन १२९७ अशी मानली जाते.संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली.ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला.तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला.यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला.संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली असे मानले जात असले तरी हि समाधी काही काळानंतर लुप्त झाली होती.ती संत गंगागिरी महाराज यांनी प्रकाश झोतात आणली असे मानले जाते.त्यामुळे या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि भागवंत धर्माचे वारकरी दरवर्षी दिंड्या घेऊन येत असतात.यावर्षी हा उत्सव बुधवार दि.२५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राज्याच्या विविध भागातून दिंड्या मार्गस्थ झाल्या आहे.यातील एक दिंडी ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनात श्री क्षेत्र भऊर ता.वैजापूर येथून सोमवार दि.१७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रवाना झाली असल्याची माहिती प्रमोद जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर दिंडीचा पहिला मुक्काम हा कोकमठाण येथील सावळेराम देवराव रक्ताटे यांचेकडे तर दि.१८ जानेवारी रोजी दुसरा मुक्काम पोहेगाव येथील मधुकर पोटे यांचेकडे,दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी बाळासाहेब पांगरकरयेथे होणार आहे.तर दि.२० जानेवारी रोजी तिसरा मुक्काम हा सिन्नर येथील ब बाळनाथ निवृत्ती पगार यांचेकडे होणार आहे.तर चौथा मुक्काम २१ जानेवारी रोजी सायंकाळी,’तरुण महाराष्ट्र मित्र मंडळ’ नाशिक रोड प्रमिला बाळासाहेब बारगळ यांचेकडे होत आहे.तर पाचवा मुक्काम हा दि.२२ जानेवारी रोजी सोपान रायभान जगताप सातपूर या ठिकाणी होत आहे.दि.२३ जानेवारी रोजी पाचवा मुक्काम तळवाडे येथे भाऊसाहेब बोडखे यांचेकडे होणार आहे.तर दि.२४ जानेवारी रोजी सहावा मुक्काम हा त्र्यंबकेश्वर येथे भास्कर अंबरगिरी बाबा,गोरखनाथ काशिनाथ भारती यांचेकडे होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सातवा मुक्काम हा त्र्यंबकेश्वर येथील कैलास शिनगर यांचे कडे हरी ओम ढाब्याचे मागे पेट्रोल पंपा शेजारी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणार असल्याची माहिती आहे.सदर दिंडीस भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संजय महाराज जगताप यांनी दिली आहे.
