Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
अ.नगरखेळ

मुला – मुलींचे लग्न यावर ‘साई तारा’ ग्रुपतर्फेरविवारी श्रीरामपूरात चर्चासत्र आणी मेळावा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सध्याच्या कलियुगामध्ये मुला – मुलींचे लग्न करणे ही एक मोठी समस्या झाली असून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामपूर येथील ‘ साई तारा ‘ मराठा वधू – वर ग्रुपतर्फे रविवार दि . २१ जुलै २०२४ रोजी ‘ मुला – मुलींचे लग्न ‘ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र व फक्त मराठा समाजातील मुला – मुलींचा वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साई तारा मराठा ग्रुपचे ॲडमिन निवृत्त प्राध्यापक, पत्रकार रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सांगितली.
श्रीरामपूर येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ . ०० वाजता हे चर्चा सत्र आणी वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असून या चर्चा सत्राची व वधू – वर मेळाव्याची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
या चर्चा सत्रात अ.नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . माहेश्वरी वीरसिंग गावित , श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि साई तारा ग्रुपच्या ॲडमिन आणि माजी प्राचार्या रजनीताई रघुनाथ गोंदकर उपस्थित राहून वधू – वर आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा.राऊत यांनी सांगितले.
आज मुला – मुलींचे लग्न जमविणे एक चिंतेचा विषय झाला आहे. अनुरूप जावई आणि अनुरूप सून मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. अशा या मूलभूत प्रश्नावर सामूदायिक चर्चा घडावी व वधू – वरांसह त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने या चर्चा सत्राचे व वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हे चर्चासत्र व वधू – वर मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन श्रीमती मीनाताई जगताप , सौ . रामेश्वरी लाटे , श्री . संतोष जगताप पाटील, प्राचार्या रजनीताई गोंदकर व प्रा . रामचंद्र राऊत आणी त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत .
या चर्चासत्रास व मेळाव्यास मराठा समाजतील वधू – वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . अधिक माहिती साठी ९२२५ ३१४ ७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button