Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी

शिर्डी : भाऊ-बहिणीच्या पवित्र, अतूट प्रेमाचे, आपुलकीचे आणि रक्षणाच्या वचनाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण शिर्डी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांच्या उपस्थितीत हा भावनिक स्नेहसोहळा पार पडला.
शिर्डीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्री थोरात यांनी शिर्डीतील महिला व मुलींना प्रत्यक्ष भेटून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याची विनंती सुजय विखे यांच्याकडे केली होती. या विनंतीला तत्काळ मान देत त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास संमती दिली.
राखी पौर्णिमेचे औचित्य साधून शिर्डीतील हॉटेल स्वामी रिसॉर्ट येथे आयोजित कार्यक्रमाला सुजय विखे यांनी उपस्थिती लावली. यावेळी नगराध्यक्षा जयश्री थोरात, नगरसेविका तसेच शहरातील महिला व मुलींनी त्यांच्या हातावर राखी बांधून औक्षण केले. यावेळी उपस्थित महिलांना पैठणी साडीची भेट देण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


महिलांच्या सुरक्षिततेबाबत कठोर भूमिका
यावेळी बोलताना सुजय विखे यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठाम भूमिका मांडली. महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटकाला अथवा प्रवृत्तीला मतदारसंघात पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातील कोणतीही व्यक्ती असुरक्षित राहणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या स्वावलंबनाच्या दृष्टीनेही प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.


महिलांच्या आत्मसन्मानासह आर्थिक स्वावलंबनावर भर
नगराध्यक्षा जयश्री थोरात यांनी यावेळी बोलताना शिर्डीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे सांगितले. तसेच राधाकृष्ण विखे सुजय विखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे आणि धनश्री विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपरिषद महिलांचा आत्मसन्मान आणि रोजगार या दोन्ही बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना केवळ सन्मानाची वागणूक देणे पुरेसे नसून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हाच त्यांच्या खऱ्या सन्मानाचा मार्ग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या उद्देशाने शिर्डीतील महिलांसाठी शासकीय व सामाजिक स्तरावर विविध उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


महिलांना सामाजिक आणि आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही दूरगामी व सकारात्मक भूमिका घेण्यात आली असल्याचे नगराध्यक्षा जयश्री थोरात यांनी सांगितले.
यावेळी शिर्डी नगरपरिषदेच्या गटनेत्या प्रतीक्षा कोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गोंदकर, पाणीपुरवठा समितीच्या सभापती कोमल बोराडे, नगरसेविका सुनीता त्रिभुवन, गायत्री बर्डे, छाया शिंदे, विद्या शेजवळ, सरिता सोनवणे, अलका गोतीस, वैशाली कोते, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रेखा रणमाळे, तसेच योगिता गोंदकर, शिल्पा गायकवाड, सोनाली धिवर, प्रतिभा रासने, उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील, सभापती, नगरसेवक व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button