शिर्डी (प्रतिनिधी) —
निमगाव कोराळे येथील ४० वर्षिय इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाचा पाय खराब झाल्याचा धक्कादायक घटनेला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध प्राथमिक अहवाल मागवून पुढील कारवाईचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांकडून समजते
डॉक्टरकडून घेतलेल्या उपचारामुळे रुग्णाला त्रास झाल्याच्या तक्रारीवर जिल्हा आरोग्य विभागाने नाशिक व अहमदनगर येथील तज्ज्ञ समितीकडून तपास अहवाल मागवला आहे. तसेच “अवैद्य उपचार, चुकीचा इंजेक्शन डोस आणि वेळेत रेफर न करण्याबाबत” चौकशी आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टराने स्वतःकडे आवश्यक परवानगी व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा नसतानाही उपचार केले, तसेच रुग्णाला वेळेत मोठ्या रुग्णालयात हलवले नाही.
यामुळे सेप्टिकचा फैलाव वाढत गेला आणि अखेर रुग्णाला पाय गमवावा लागतो की काय अशी भिंती निर्माण झाली असुन आजार किडणी पर्यंत पोहचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे प्रशासनाच्या अहवालात नमूद केलं आहे की
गावकऱ्यांचा संताप उफाळला
दरम्यान, गावात डॉक्टरविरोधात संताप व्यक्त होत आहे. “एका इंजेक्शनमुळे एका घरच उद्ध्वस्त झाले आहे, पण प्रशासनाला कारवाईसाठी आठवडे लागतात!” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले डॉक्टरच्या गोड बोलण्याने अनेक गरीब कुटुंबं त्याच्याकडे जातात.
न्याय मिळणार का?
जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे जर रुग्ण पुढे आला तर आरोग्य खात्याने डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या शक्यतेचा अभ्यास सुरू केला आहे.
दरम्यान, पीडित कुटुंबाने प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली असून “जीवनभराचा चटका देणाऱ्या” या प्रकरणाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
पुढील भागात:
“अवैद्य डॉक्टरांचा गावागावात वाढता सुळसुळाट — जबाबदार कोण?”
(भाग–३ लवकरच…)
DN SPORTS

