Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
क्राईमराजकीय

शिंदेसेनेत एजंट, सगळा अंदाधुंद कारभार!शिंदे गटात कोणाचाच कोणाशी ताळमेळ नाही

शिर्डी (प्रतिनिधी) शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेलेल्या शिवसेनेच्या विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांची आज घरवापसी झाली आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांचे परत शिवसेना ठाकरे गटात आगमन झाल्यामुळे त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. ठाकरे गटात आल्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाऊन मोठी चूक असे सांगत पुढे त्या म्हणाले की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मी स्वत:हून काही कारणास्तव म्हणजे माझ्या रागावर माझे नियंत्रण राहिले नाही. मी शिंदे गटात गेले मात्र तेथे ताळमेळ नाही. मी वयाच्या 10 वर्षापासून मी ठाकरेशिवसेनेचे काम करत आहे. गटप्रमुख ते महिला विभागसंघटक या पदापर्यंत मी पोहचले. जसे जसे काम केले तसे पुढे गेले. मला मातोश्रीचा पाठिंबा होता म्हणूनच मी एवढे वर्ष काम करु शकले. जवळजवळ 35 वर्ष मी संघटनेचे काम केले आहे. असे सांगत त्यापुढे म्हणाले की,शिंदे गट जो आहे. तो फसवत आहे.

लोक कोणत्या आमिषाला पडून तिथे जातात मला काही कळत नाही. मला चार महिन्यातच अनुभव आला की इथे राहणे शक्यच नाही. मला काही रात्र झोप लागत नव्हती. मी कधी वहिनी आणि साहेबांशी बोलते असे वाटत होते. त्या पुढे म्हणाल्या, आपण फार मोठी चूक केलेली आहे. हा सर्व देखावा आहे. आणि जे नगरसेवक ते घेत आहेत.

पैसे देऊन 2 कोटी, 3 कोटी असे लोक बोलत आहेत. पण त्या लोकांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतोय. काही पदाधिकारी तर माझ्याशी याबाबत बोलले होते.


तिथे कोणाचाच कोणाशीच ताळमेळ नाही. तिथे अंदाधुंद कारभार चालू आहे. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी पैसे देऊन काही लोकांना खरेदी केले. नक्कीच तिथल्या लोकांना पश्चाताप होतोय.

शिंदेचे तिथे लक्ष नाही. मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं. मलाही फसवलं असे मी जाहीर इथे सांगते. या सर्व गोष्टींना वैतागून मी पुन्हा माझ्या माहेरी संजय ठाकरे शिवसेनेत आली याचा खराच आनंद वाटतो. लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी विनंती करते. असे सुजाता शिंगाडे यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button