Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

सचिन गीधे प्रकरणाला राज्यस्तरीय वळण! पीडित नातेवाईकांचा आक्रोश — “मुख्यमंत्र्यांपर्यंत दाद मागणार

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी येथून सचिन कल्याणराव गीधे यांचे संशयास्पद अपहरण होऊन अनेक दिवस उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई पाहता आता पीडित नातेवाईकांनी थेट राज्य सरकारकडे दाद मागण्याचा इशारा दिला असून, प्रकरणाला राज्यस्तरीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सचिन गीधे यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी एकत्र येत पत्रकार परिषद व निवेदनाद्वारे तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की,
“हा प्रकार केवळ मिसिंगचा नाही, तर सुनियोजित अपहरणाचा आहे. तरीही पोलीस तपास अत्यंत संथ असून दोषींना अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असल्याचा संशय आम्हाला येत आहे.”
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार,
या प्रकरणातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असूनही आजतागायत एकाही आरोपीला अटक झालेली नाही, ही बाब धक्कादायक आहे. तपासात ठोस प्रगती न झाल्यामुळे कुटुंबीय मानसिक तणावाखाली असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावेळी संतप्त नातेवाईक म्हणाले,
“आम्ही वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले, पण केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. आता आम्ही थेट मा. मुख्यमंत्री, गृहमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देणार असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहोत.”
नातेवाईकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर लवकरात लवकर सचिन गीधे यांचा शोध लागला नाही व दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
या प्रकरणात पोलीस प्रशासन खरोखर गांभीर्याने तपास करणार का?
की पुन्हा वेळकाढूपणा करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार?
हे पाहणे आता संपूर्ण जिल्ह्यासाठी कुतूहलाचा व संतापाचा विषय ठरला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button