Letest News
ठकसेन भोप्यासह त्याचे चुलते वडील भाऊ व इतर दोघांवर शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 21 लोकांनी केला गुन्हा... श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हरीनामाने दुमदुमली 15 चारी भक्तिमय वातावरणात बालगोपाळां सह शिक्षकांनी पावली वर धरला ठेका श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!” सावळे कुटुंबियांनी संघटित गुन्हा केलेला असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी मधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला 19 वर्षांनंतर ठाकरे एकत्र अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता ह्या क्ष... shirdicrimenews ठकसेन भोप्या साळवे याच्या अर्चणीत वाढ़ राहाता येथेही गुन्हा दाखल साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या वि... पोलीस अधीक्षकसह शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऍक्शन मोड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला केले हद...
अ.नगरराजकीय

अहिल्या नगर हद्दीतील 41 ओढे नाले साफसफाई,अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे – श्री.संतोष नवसुपे

अ.नगर – अहिल्या नगर शहरातील मनपा हद्दीत असणारे 41 ओढे नाले नष्ट झाल्यामुळे शहरांमध्ये भर पावसाळ्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन याचे नियोजनाचा अभाव असल्याने व मनपाने नेमून दिलेल्या ठेकेदार व त्याची यंत्रणा अयशस्वी ठरल्याने गेली दहा ते पंधरा वर्षापासून संपूर्ण मॅनेजमेंट होऊन अंतर्गत नालेसफाई व तसेच सीना नदी व अंतर्गत येणारे ओढे- नाले यांची सफाई ठेकेदार एजन्सीला दिले जाते,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु यावर कोणताच वचक नसून सीएसआय व एसआय हे फक्त कागदोपत्री ठेकेदारांना काम केल्याचे सर्टिफिकेट देतात, परंतु रस्त्यावर काम होताना दिसत नाही. तसेच सीना नदीचा गाळ जेसीपीने तिथल्या तिथच सरकावला जातो. व पुर आल्यानंतर तो गाळ पुन्हा तेथेच येऊन पडातो.


तसेच शहरातील 32 हॉस्पिटल यांची चौकशी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर झालेली चौकशी होती. पुढे या 32 हॉस्पिटलच्या काय कारवाई केली याची मनपाने कुठलीही माहिती दिलेली नाही. हे अचानक हे हॉस्पिटल पावन कसे करून घेतले. हा नागरिकांना पडलेला प्रश्‍न आहे.


तसेच उपनगरातून व शहरातील मध्यवस्तीत येणारे दिल्ली गेट कापड बाजार, नवी पेठ व जुना बाजार या ठिकाणी वाहने लावण्यास व्यापारी दुकानदार मज्जाव करतात. यासाठी व तसेच प्रत्येक दुकानापुढे लागणार्‍या चार चाकी व्यावसायिक गाड्या यामुळे नागरिकांना शहरात पायी चालण्यासाठी साधी वाटही मिळत नाही.

मोठमोठ्या सणांना महिला व जेष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांना फार मोठ्या त्रासातून जावे लागते. तरी या आमरण उपोषणात वरील दोन मुद्द्यांपैकी या ठिकाणी रास्ता रुंदी करण्यात यावी, असे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार अशी माहिती पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती संतोष नवसुपे यांनी दिली.


यावेळी शहराध्यक्ष अक्षय कांबळे ,संघटन मंत्री संतोष त्रिंबके, जिल्हाध्यक्ष सतीश खैरे, उत्तर जिल्हाध्यक्ष करण गारदे भिंगार शहराध्यक्ष राकेश सारवान कुणाल बैद नवनाथ मोरे महिला आघाडी उमा छजलाने सुनिता चव्हाण तसेच व्यापारी आघाडी प्रमुख विजय पितळे, जय बोरा ,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगधने,

माजी नगरसेवक अनिल शेकटकर, ओबीसी आघाडी बाबासाहेब करपे , यशवंत पानसरे, प्रितम परदेशी,निलेश पालवे ,देवदत्त पुजारी ,मंगल बरगडे ,पुनम शिंदे, वैशाली सावंत आदि पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button