Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
Blog

युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन व संस्कृती जतन करण्यासाठीजिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 5 डिसेंबर रोजी आयोजन!

अहमदनगर( प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 डिसेंबर, 2023 रोजी सरदार पटेल कार्यालय, हॉटेल राज पॅलेस शेजारी, टिळक रोड, अहमदनगर येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जिल्हयातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच १५ ते २९ वयोगटातील युवकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कौशल्य विकासमध्ये कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), फोटोग्राफी, संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान तसेच युवाकृतीमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रॉडक्ट आदी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

        स्पर्धेमध्ये सहभागासाठी १५ ते २९ वयोगटातील (दि. ०१ एप्रिल, २०२३ रोजी वयाबाबत परिगणना करावी) युवक व युवती यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारीतोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button