Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

भक्तनिवासात महिला भाविकेचा विनयभंग- कंत्राटी कर्मचारी फरार

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत अत्यंत संतापजनक घटना घडली असून, साई संस्थानच्या भक्तनिवासात राहणाऱ्या एका २० वर्षीय महिला भाविकेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी कंत्राटी सफाई कर्मचारी अमन पठाण (रा. वाळकी, ता. राहाता) याच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील एक कुटुंब ४ जून रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. हे कुटुंब साई संस्थानच्या भक्तनिवासात मुक्कामी होते. ५ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीचे आई-वडील व बहीण दर्शनासाठी गेले असताना ती एकटीच खोलीत होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याचवेळी खोलीची बेल वाजल्याने तिने दरवाजा उघडला. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने तिच्याशी बोलण्याचा बहाणा करत खोलीत येण्याची विनंती केली. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला दुसऱ्या रूमजवळ बोलावले. तेथे गेल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून खोलीत ओढले व तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच स्वतःचा मोबाईल नंबर ठेवण्यास सांगत आपले नाव अमन पठाण असल्याचेही आरोपीने सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत पीडित तरुणी तेथून पळून आपल्या खोलीत परतली.
घटनेची माहिती मिळताच साई संस्थान प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे साईनगरीतील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संस्थानच्या निवासस्थानी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. श्रद्धेच्या नगरीत भाविकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शिर्डीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात महिला भाविकेच्या विनयभंगाची घटना अत्यंत निंदनीय आहे. असे प्रकार शिर्डीत खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी. अशा घटनांमुळे साईबाबांच्या शिर्डीची बदनामी होत असून भाविकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.”
— कमलाकर कोते
जिल्हाध्यक्ष, शिवसेना

महिला भाविकेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून अशा प्रकारच्या घटनांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल.”
— रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस ठाणे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button