स्वरूप विष्णू जाधव (वय २८) असे त्यांचे नाव आहे. ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते. लग्नाची तयारी सुरु असतानाच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
स्वरूप जाधव हे मूळचे कसबा बावड्यातील भगवा चौक, मराठा कॉलनीचे रहिवासी होते. त्यांनी स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या रूममधील खिडकीला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतला. ते 2023 मध्ये पुणे पोलीस दलात भरती झाले होते.स्वरूप यांचे लग्न ठरले होते.
दिवाळीनंतर ते लग्नाचा बार उडवणार होते. “माझे आता लग्न ठरलेय. रजा शिल्लक पाहिजे. दिवाळीनंतर मी लग्न करणार आहे. तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा”, असे ते मित्रांना नेहमी म्हणायचे, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.स्वरूप यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पुणे खडकवासला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबातील तरुण पोरानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. स्वरूप यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी असा परिवार आहे.
मंगळवारी सकाळी बावडा स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.