Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
क्राईमशिर्डी

तळघर घोटाळा? आरतीनंतर गुप्त डील- पुजाऱ्याची धमकी- पैशांचं जाळं उघड? कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले तक्रार अर्ज दाखल

शिर्डीतील साईबाबा मंदिरात घडल्याचा आरोप असलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पंढरपूर आरती संपताच दिल्लीहून आलेल्या देणगीदार भक्तांना गुरुस्थान येथील तळघरातील जिन्यात नेऊन ‘खासगी व्यवहार’ केल्याचा गंभीर आरोप पुजारी दिगंबर कुलकर्णी यांच्यावर करण्यात आला आहे. “आम्ही काहीही देऊ, तुम्हाला काय करायचं?” असे उत्तर संबंधित भक्तांकडून मिळाल्याने संशय अधिकच बळावला आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अशा प्रकारे पैशांचा सौदा होत असल्याची चर्चा उघडपणे रंगू लागली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


⚠️ तक्रार दिल्यावर थेट धमकी – “मी शिर्डीत पेटी घेऊन आलेलो नाही, पाहून घेईन!”
या प्रकरणी प्रमोद गोंदकर यांनी थेट सवाल उपस्थित करताच वातावरण तापलं. तक्रार करण्याची सूचना मिळताच संबंधित पुजारीने फोन करून “तुम्हाला काय करायचं ते करा, मी सक्षम आहे, पाहून घेईन” अशा शब्दांत धमकी दिल्याचा गंभीर आरोप अर्जात नमूद आहे. सार्वजनिक सेवेत असणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणं ही बाब अधिकच संतापजनक ठरत आहे.


💸 हॉटेल, रूम बुकिंग, विमानतळ, तिकीट… ‘सेवे’च्या नावाखाली पैशांचं जाळं?
तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संबंधित पुजारी भक्तांच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटी देणे, रूम बुक करून देणे, विमानतळावर ने-आण करणे, तसेच विमान तिकिटांची व्यवस्था करून घेणे – या सर्व व्यवहारांमधून पैशांची मोठी देवाणघेवाण होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मंदिराच्या पवित्र व्यवस्थेबाहेर एक स्वतंत्र ‘नेटवर्क’ कार्यरत असल्याची चर्चा आता जोर धरत आहे.

2


📜 रजिस्टरलाही फाटा? नियम धाब्यावर – प्रशासन झोपेत?
मंदिरात हालचालींचं रजिस्टर असतानाही संबंधित पुजारी त्यात कोणतीही नोंद करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. म्हणजेच, अधिकृत नोंदी टाळून गुप्त हालचाली सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा प्रकार केवळ शिस्तभंग नसून संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे.


📢 “ताबडतोब निलंबन करा!” – ग्रामस्थांचा एल्गार, मोठ्या संख्येने अर्ज दाखल
संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज सादर केला आहे. संबंधित पुजारीवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई, निलंबन आणि सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून “श्रद्धेचा बाजार थांबवा!” असा जोरदार आवाज उठवला.
👉 साईबाबांच्या नावावर चालणाऱ्या या कथित ‘तळघर घोटाळ्या’मुळे भाविकांच्या भावना तीव्र दुखावल्या असून, शिर्डीत वातावरण अत्यंत तापले आहे. आता प्रशासन कठोर पाऊल उचलणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दडपलं जाणार?

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button