Letest News
जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु...
क्राईमशिर्डी

शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार केंद्राचे तोडले बोर्ड व कॅमेरे!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये व्हाइटनर ची नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असून नशेमध्ये ही व्हाइटनर गॅंग धुमाकूळ घालत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या व्हाईटनर गॅंगने शिर्डी येथील नगर परिषदेच्या शेजारी शासकीय आधार केंद्राच्या बाहेरील बोर्ड तोडून व आधार सेंटरचे कुलूप तोडून त्याचप्रमाणे तेथील कॅमेरे चे नुकसान करून धुमाकूळ घातला असून तशी शिर्डी पोलीस स्टेशनलाही तक्रार देण्यात आली आहे.

या व्हाइटनर गॅंगचा पोलिसांनी तपास लावून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी साईभक्त, ग्रामस्थांनी केले आहे. या संदर्भात गणेश रामदास शिंदे राहणार श्रीराम नगर शिर्डी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

आपले शिर्डी नगरपरिषद येथील शिर्डी उपविभागीय कार्यालयासमोर शासकीय आधार सेंटर असून 25 मे 2025 रोजी रविवार असल्याने शासकीय सुट्टीमुळे आपण ऑफिस बंद केलेले होते. मात्र 26 मे 2025 रोजी सकाळी ऑफिस उघडण्यास गेलो असता येथील माझ्या आधार नोंदणी कार्यालयाचे बोर्डाचे तसेच कॅमेऱ्याचे नुकसान झालेले आहे.

अज्ञात ईसमांनी ते कॅमेरे तोडून नुकसान केलेले असून या परिसरात कमी वयाचे तरुण व्हाइटनर नशा करून धुमाकूळ घालतात. अशी चर्चा आहे. या व्हाइटनर गॅंग चा तपास करून त्यांचा बंदोबस्त करावा .अशी मागणी गणेश रामदास शिंदे यांच्या बरोबरच येथील दुकानधारक व ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button