Letest News
कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य...
क्राईमशिर्डी

राहाता येथे एका कारसह 13 किलो गांजा व एकाला पकडले रंगेहाथ! दुसरी स्विफ्ट कार मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने पसार!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

श्रीरामपूर शहरात बुधवारी श्रीरामपूर शहर पोलिसांनी ४ किलोचा गांजा पकडल्यानंतर गुरुवार दि. ८ मे रोजी राहात्यातील राहाता शिर्डी रोडवर स्थानिक गुन्हेशाखेने कारवाई करत इको स्पोर्ट कारमधील १३ किलो गांजासह एकाला रंगेहाथ पकडले असून या कार मागील दुसरी स्विफ्ट कार पोलिसांची चाहूल लागल्याने पसार झाली आहे.

DN SPORTS

kamlakar


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गुरुवारी दुपारी राहाता-शिर्डी रोडवर साकुरी जवळील समाधान हॉटेल येथे सापळा रचून इको स्पोर्ट कार क्र. एम.एच.१५ ईक्यु ९९२२ ही आडवली असता त्या
कारमागे असलेली दुसरी स्विफ्ट कार पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी जोरात कार पळवून नेली आहे.

पकडलेल्या इको स्पोर्ट कारमध्ये १३ किलो ३१८ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा) आढळून आला असून अरुण मोतीलाल विश्वकर्मा वय ४५ रा. गितराम सोसायटी, दत्तमंदिर नाशिक रोड, नाशिक याला ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या अरुण विश्वकर्मा याने ओडिसा राज्यातून नशेकरिता विक्रीसाठी गांजा आणल्याचे सांगितले. तसेच ४० किलो गांजासह स्विफ्टमध्ये पसार झालेले साथीदार नितीन उर्फ अण्णा जाधव रा. निमगाव कोराळे,साईनाथ उर्फ शिरीष गायकवाड रा. शिर्डी यांच्यासह कारचालक असल्याचे त्याने सांगितले.

ओडिसा राज्यातून जयराम (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडून विक्रीसाठी ४० किलो गांजा आणल्याची माहिती त्याने दिली. या प्रकरणी राहाता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहाता पोलिस करीत आहे. सदरची कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button