Letest News
ठकसेन भोप्यासह त्याचे चुलते वडील भाऊ व इतर दोघांवर शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 21 लोकांनी केला गुन्हा... श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हरीनामाने दुमदुमली 15 चारी भक्तिमय वातावरणात बालगोपाळां सह शिक्षकांनी पावली वर धरला ठेका श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!” सावळे कुटुंबियांनी संघटित गुन्हा केलेला असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी मधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला 19 वर्षांनंतर ठाकरे एकत्र अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता ह्या क्ष... shirdicrimenews ठकसेन भोप्या साळवे याच्या अर्चणीत वाढ़ राहाता येथेही गुन्हा दाखल साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या वि... पोलीस अधीक्षकसह शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऍक्शन मोड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला केले हद...
अ.नगरक्राईम

आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या आश्रमात शुक्रवारी रात्री महिला कीर्तनकारची आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महाराज ह.भ.प. संगीताताई पवार यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळखळ उडाली आहे. महिला कीर्तनकाराची दडगाने ठेचून हत्या होणं, ही गंभीर बाब आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे.

ह.भ.प. संगीताताई महाराज यांची यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समजताच वैजापूर आणि संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

संगीताताई महाराज यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैजापूर पोलिसांकडून हत्येचा तपास करण्यात येत आहे. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

श्वानपथक घटनास्थळी पोहचले आहे. ह.भ.प. संगीताताई महाराज यांची हत्या का केली? कुणी केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून आश्रमात चौकशी कऱण्यात येत आहे. श्वनपथकाकडून पुरावे शोधण्याचे काम करण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अज्ञाताचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button