Letest News
साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो ! आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात
क्राईमशिर्डी

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 48 गोवंश जनावरांची सुटका व दोन आरोपीविरुद्ध शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई*
(शिर्डी प्रतिनिधी):
दि.23/12/23 रोजी शिर्डी विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की वेस ता. कोपरगाव येथील आरोपी 1) राजु नसीर ईनामदार वय-27 रा.वेस ता.कोपरगाव याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये तसेच आरोपी 2)तन्वीर गणीभाई सय्यद वय-21 रा.वेस ता.कोपरगाव याचे वेस ते रांजणगाव रोडचे कडेला असलेले पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेश दिल्याने पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या 48 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली व दोन आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी 1) हेडकॉन्स्टेबल अविनाश मकासरे फिर्यादी 2) हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 1117/2023 आणि 1118/2023 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम 1976चे सुधारित 2015 कलम 5(क),9(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, हेडकॉन्स्टेबल इरफान शेख , अशोक शिंदे,अविनाश मकासरे,सचिन धामणे,संदीप डमाळे, सागर सदाफळ , दिनेश कांबळे, सोमेश गरदास तसेच चालक सुरेश गोलवड , चालक हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button