Letest News
साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली
Blog

शिर्डीत धुम स्टाईल दागिने पळविण्याबरोबरच आता मोबाईल पळवण्याचे वाढले प्रकार!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथे आता धुम स्टाईल दागिने पळविण्याच्या प्रकाराबरोबरच हातातील मोबाईल पळवून घेऊन जाण्याचे प्रकार वाढत आहे.
शिर्डी मध्ये नगर मनमाड रोडवर बस स्टँड जवळ असाच वाकडी येथील एका तरुणाचा हातातून मोबाईल धुम स्टाईल मोटरसायकलवर घेऊन भामट्यांनी पलायन केले आहे. यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील वाकडी येथील प्रतीक धनेश्वर कोते (वय तेवीस )यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण तीन डिसेंबर 2023 रोजी सकाळी सात वाजता माझ्या आते भाऊ आकाश यास मुंबई येथे सोडवण्यास करिता गेलो होतो. त्याला मुंबईला सोडून मी चार डिसेंबर 2023 रोजी ट्रॅव्हल्स बस ने पहाटे साडेपाच वाजता च्या सुमारास शिर्डी येथे हॉटेल हॉलिडे पार्क समोर उतरून रोड क्रॉस करून नगर मनमाड रोडवर एका मोबाईल शॉपी समोर वडील मला घेण्याची वाट पाहत होतो .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मला घ्यायला येण्याकरता वडिलांना फोन करत असता राहत्या कडून शिर्डी कडे येणाऱ्या रोडवर माझ्या पाठीमागून एक शाईन कंपनीचे मोटरसायकल वर दाढी वाढलेला निळ्या रंगीत शर्ट घातलेला एक इसम माझ्या हातातला चालू फोन पाठीमागून ओढून शिर्डी गावाच्या दिशेने निघून गेला. चाळीस हजार रुपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा एप्पल कंपनीचा आयफोन धूम स्टाईल हातातून पळवून चोरी गेला आहे. अशा‌ अशायाची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 10 72 भादवी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button