Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
Blog

दिवाळी सण आनंदात साजरा करत असताना विविध गोष्टींची काळजी घेणेही महत्त्वाचे!

शिर्डी ( प्रतिनिधी) सध्या दिवाळी सण हा सर्वात मोठा समजला जाणारा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे. हा सण आनंदाने साजरा करत असताना प्रत्येकाने काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन केले जाते. सोने-चांदीच्या वस्तू ,पैसे, मौल्या वस्तू यांची पूजा केली जाते. एका ठिकाणी त्या ठेवल्या जातात. आणि कधी कधी भामटे त्यावर नजर ठेवून मग रात्री झोपल्यानंतर त्यावर डल्ला मारतात .अशा काही घटना घडलेल्या आहेत .त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच शाळा महाविद्यालये,व शासकीय सुट्ट्या या दिवसात असल्यामुळे अनेक जण आपल्या दुसऱ्या मूळ गावी सण साजरा करण्यासाठी जातात.व येथील आपल्या घराला कुलूप लावतात. मात्र अशावेळी चोरटे नजर ठेवून घरफोडी करून चोरी करतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शेजारी सांगून जावे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शेजाऱ्यांनी ही दक्ष जागृत नागरिक म्हणून अशावेळी शेजारच्या घरावर लक्ष ठेवावे .त्याचप्रमाणे सणाच्या दिवसात बस, रेल्वे यांना मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे सोन्याची दागिने, मौल्यवान वस्तू, पैशाची पर्स ,पाकिटे यांचे चोरी करण्याची दाट शक्यता असते .त्यासाठी आपण प्रवास करताना दक्ष राहणे गरजेचे आहे. शिर्डीत दिवाळी सुट्टी मध्ये साई भक्तांची साई दर्शनासाठी गर्दी होत असते. राज्यातून परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डित दीपोत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे गर्दी होत असते .याचा भामटे ,पाकीटमार गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करू शकतात. अशा यापूर्वी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक साई भक्तांनी सावध राहिले पाहिजे.

kamlakar

आपले मौल्यवान वस्तू दागिने पैसे सांभाळले पाहिजे. सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे.पोलीसदल हे कोणताही सण असो नागरिकांची सुरक्षितता याला अधिक महत्त्व देत असते व नागरिकांची सुरक्षितता ठेवण्याचे काम अहोरात्र करत असतेच. पण नागरिकांनी, ग्रामस्थांनीही एक जागृत नागरिक म्हणून संशयित कोणी वाटल्यास पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. दीपावली सणानिमित्त फटाके फोडण्यात येतात. मात्र अनेकदा लहान मुले फटाके वाजवताना जखमी झाल्याच्या घटना झालेल्या आहेत. तरी फटाके वाजवताना मुलांची काळजी घ्यावी. मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्याचे टाळावे. फटक्यांमुळे प्रदूषण वाढू नये याची काळजी घ्यावी. तसेच अनेकदा फटाक्यांमुळे आगी लागतात.

त्यासाठी दक्षता घ्यावी. हॉस्पिटलमध्ये रुग्ण असतात. त्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून अशा ठिकाणी काळजी घ्यावी.पोलीस दल सदैव तत्पर असतेच मात्र नागरिकांनी एक जागृत नागरिक म्हणून या कालावधीत दक्ष राहिले पाहिजे. हा दीपावलीचा सण सर्वांनी आनंदात साजरा करावा मात्र तो साजरा करत असताना स्वतःची ,कुटुंबाची काळजीही घ्यावी. असे आवाहन करत ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख-समृद्धीची भरभराटीची जावो अशा शुभेच्छा शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके ,पोलीस निरीक्षक सोपानराव गायकवाड, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शिर्डी सह परिसरातील सर्व नागरिकांना दिल्या आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button