Letest News
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ...
क्राईमशिर्डी

सावधान…….   संस्थान कर्मचारीस धमकी द्याल तर जेल मध्ये जाल 

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे गावकरी गेटने साईदर्शनासाठी जाण्याकरता चार हिंदी भाषिक साई भक्तांना घेऊन आलेल्या ऋषी विजय पारधी याला
त्याच्याबरोबर असणारे हिंदी भाषिक साईभक्त गावकरी गेटने सोडण्यास आपण मनाई केल्यामुळे त्याचा राग येऊन त्याने शिवीगाळ करत ढकलून देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद श्रावण तुकाराम कोते या संस्थांनच्या कायम सुरक्षा कर्मचाऱ्यांने शिर्डी पोलीस स्टेशनला केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‌ यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील साई संस्थांनचे कायम सुरक्षा कर्मचारी श्रावण तुकाराम कोते यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दिनांक २५/१२/२०२४ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १२-०० ते सायंकाळी ०८-०० वा. पावेतो श्री साईबाबा मंदीर गावकरी गेट येथे मला ड्युटीवर नेमलेले होते. माझे सोबत कायम सुरक्षा कर्मचारी किसन दगडू भारती तसेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा कर्मचारी मानस मनोहर साळुंखे व महिला कर्मचारी स्वाती रत्नाकर गांगुर्डे हे देखील होते.


सायंकाळी ०७-०० वा. चे सुमारास श्री साईबाबा समाधी मंदीराचे गावकरी गेट ला स्थानिक ग्रामस्थ व दिव्यांग व्यक्तींचे आधारकार्ड पाहून दर्शनाला प्रवेश देत होतो. त्यावेळी शिर्डी मधील ग्रामस्थ नामे रूषी विजय पारधे, (श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था कंत्राटी कर्मचारी विजय पारधे यांचा मुलगा) हा गेट वर आला. त्याने त्याचे आधारकार्ड दाखवले. त्याचे सोबत चार साईभक्त होते ते हिंदी भाषिक होते.

मी त्यास म्हणालो की, तू गावकरी असल्याने येथून फक्त तुला सोडता येईल. साईभक्तांना गेट क्र. ०६ किंवा ०७ ने सोड. तेव्हा तो मला म्हणाला की, येथून जायला मला व माझे गेस्ट यांना कोणी अडवले नाही. तू कोण असे म्हणून आईबहिणीवरून अतिशय गलिच्छ शिवीगाळ करू लागला. मी त्याला विरोध करत असल्यानें तो गेटने मला ढकलुन बळजबरीने आतमध्ये आला व तेथे असणारे संरक्षण कर्मचारी किसन भारती यांचेशी हुज्जत घालू लागला.

मी त्याला बाहेर जाणेचा इशारा केला असता, मादरचोद तू कसा सोडत नाही ते बघतो. तू बाहेर भेटला की, तुला बघून घेतो. असे म्हणून माझेकडे खुन्नस मध्ये बघीतले व मी करीत असलेल्या शासकीय कामात त्याने अडथळा निर्माण करून जीवे मारायची धमकी दिली. परत जात असतांना तो पुन्हा अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत गेला. मला आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याने व जीवे मारायची धमकी दिल्याने

मी सकाळी ड्यूटीला आल्यानंतर काल घडलेला प्रकाराबाबत संरक्षण विभागाचे अधिकारी रोहिदास माळी यांना सांगितला. वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करून पोलीस स्टेशनला वरील आशयाची फिर्याद दाखल केली . या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 700/ 2024 नुसार बी एम एस 2023 नुसार कलम 132 ,296, 352, 351, (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button