Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरराजकीय

संजीवनीवर आयकर विभागाची धाड,तीन दिवस चौकशी,अहवाल नाशिकला

नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित साखर कारखाण्यासह संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड पडल्याची माहिती असून ०३ जून पासून आतापर्यंत तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क,शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू असून त्याचे अहवाल नाशिक येथील आयुक्त कार्यलयास पाठवला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठ्या राजकीय घडमोडी घडतांना पाहायला मिळत आहे.आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून या दिवशी नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

तर महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे.शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असणारे अ.नगर जिल्ह्यातील कोपरगावचे किशोर दराडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने ८ जूनच्या दुपारी अडीच वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयात कोल्हे आणि दराडे यांच्यात नाशिक आणि कोपरगावात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अध्यक्ष असलेल्या संजीवनी अर्थात शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित संस्थांवर तीन दिवसापूर्वी धाडी पडल्या असल्याची विश्वासनीय माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली होती.मात्र त्यास दुजोरा मिळाला नव्हता तो आज प्राप्त झाला आहे.

लोकसभा निवडणूक सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगावात माजी खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी तहसील मैदानात सभा सुरू असताना त्यांनी येसगाव येथील कोल्हे वस्तीवर माजी आ.स्नेहलता कोल्हे व कारखाण्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांची भेट घेतली होतीव त्या भेटीत संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना शिक्षक मतदार संघाचा शब्द दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.त्यानंतर ही मंडळी लोकसभा निवडणुकीत सहभागी झाली होती.


दरम्यान त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषी मंत्री दादा भुसे,ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन आदींनी भेट घेऊनही ते सक्रिय झाले नव्हते.त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच त्यावर मार्ग निघेल असा इशारा दिला होता.त्यामुळे वरिष्ठ नेत्यांत संताप असल्याची माहिती आहे.अखेर फडणवीस यांनी त्यांना शब्द दिला असल्याचा त्यांचा दावा होता असे मानले जात होते.त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच आपली यंत्रणा कामाला लावली होती.त्यामुळे त्या शब्दाला दुजोरा मिळाला होता.

दरम्यान दि.०३ जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित संस्थांवर धाडी टाकल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.त्यासाठी आमच्या प्रतिनिधीस माहिती मिळाली होती.मात्र त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नव्हता.त्यामुळे ही बातमी प्रसिद्ध झाली नव्हती.मात्र आज मात्र अधिकृत अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.व तीन दिवस ही चौकशी सुरू होती.

त्यात काय निष्पन्न झाले या बाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.मात्र संबंधित अधिकाऱ्याने सदरचा चौकशी अहवाल नाशिक विभागीय आयुक्त यांना पाठवला असल्याची बाब मान्य केली असून त्यात काय आढळले हे मात्र सांगण्यास नकार दिला आहे.मात्र आज या बाबत पथक घटनास्थळी नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र या अहवालात नेमके काय दडले आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button