Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
राजकीयशिर्डी

निकाल काहीही असो- जनतेचं प्रेम हीच खरी जमेची बाजू — योगेश गोंदकर

शिर्डी | प्रतिनिधी
लोकशाहीच्या रणांगणात विजय–पराजय हे अपरिहार्य असतात. मात्र काही व्यक्ती अशा असतात की निकाल काहीही असो, त्या माणसांच्या मनात कायम विजय मिळवून जातात. प्रभागातील निवडणूक निकालानंतर उमेदवार योगेश बबनराव गोंदकर यांनी व्यक्त केलेली भावना हीच गोष्ट अधोरेखित करते.
या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी जनतेने दाखवलेला विश्वास, दिलेले प्रेम आणि खंबीर साथ हीच माझ्यासाठी खरी जमेची बाजू आहे, अशा शब्दांत योगेश गोंदकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकशाहीच्या निर्णयाला मान देत, अत्यंत प्रगल्भ आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी निकाल स्वीकारला आहे.
“निवडणूक जिंकली नाही, पण माणसं जिंकली आहेत.
विश्वास जिंकला आहे… आणि तोच माझा खरा विजय आहे,”
असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
आपल्या प्रभागासाठीची सेवा ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नव्हती आणि राहणारही नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत “माणसांवरील आपुलकी, प्रश्नांसाठीची लढाई आणि प्रामाणिक सेवा ही कायम सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रवासात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, प्रचारात साथ दिली, मतदार म्हणून पाठिंबा दर्शवला त्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानत त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
पराभवातही संयम, संस्कार आणि सकारात्मकता जपणारी ही भूमिका आजच्या राजकारणात नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.
निकाल काहीही असो, पण सेवेचा आणि विश्वासाचा मार्ग कधीच थांबत नाही, हे योगेश गोंदकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
— आपलाच
योगेश बबनराव गोंदकर
📞 9970416414

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button