Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

ड्रोन उडविणाऱ्या तरुणाला शिर्डी पोलिसांचा झटका,”त्या” तरुणावर गुन्हा दाखल

शिर्डी (प्रतिनिधी )शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचे देवस्थान असल्याने श्री साईबाबा मंदिर व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने एक किलोमीटर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असतानाही मुंबई येथील एका तरुणाने साई मंदिरावरती ड्रोन उडवणे ,गेट नंबर चार समोरील श्री साईबाबा पुतळ्यांचे व मंदिराचे ड्रोन द्वारे शूटिंग घेऊन इंस्टाग्राम वर टाकणे व सदरच्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना देखील ड्रोन उडवून शूटिंग घेऊन सोशल मीडियावर टाकून आदेशाचे उल्लंघन केले म्हणून मुंबईतील मालाड वेस्ट येथील देव दोडीया यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गोपनीय शाखेचे अविनाश मकासरे यांनी फिर्याद दाखल केली आहे .या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला भादवि कलम 188 प्रमाणे फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकाराची शिर्डी पोलीस स्टेशन ने तात्काळ दखल घेतली त्याबद्दल साई भक्तांमधून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर हे जागतिक कीर्तीचे देवस्थान आहे. येथे सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा मंदिर व परिसरात एक किलोमीटरच्या अंतरात ड्रोन ,कॅमेरा उडवण्यास संदर्भ 652 अपोमस /दविप/महाराष्ट्र राज्य 2022 मुंबई 15/ 7 /2022 अन्वये कायदेशीर बंदी आहे. अशी कायदेशीर बंदी असतानाही सहा डिसेंबर 2023 रोजी दुपारी बारा ते चार या कालावधीत मुंबई येथील मालाड वेस्ट मधील बीएमसी कॉलनीत राहणारे देव दोडीया यांने श्री साईबाबा मंदिर व परिसरात एक किलोमीटर अंतरात श्री साईबाबा मंदिराच्या वरती ड्रोन उडवणे व गेट नंबर चार समोरील श्री साईबाबांच्या पुतळ्याचे व मंदिराचे ड्रोन द्वारे शूटिंग घेऊन इंस्टाग्रामवर टाकले व सदरच्या परिसरात ड्रोन उडवणे बंदी असताना देखील ड्रोन उडवून शूटिंग घेऊन सोशल मीडियावर टाकून आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे देव दोडीया मुंबई यांच्याविरुद्ध भादवी कलम 188 प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलीस अधिकारी अविनाश मकासरे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
साईबाबा मंदिर परिसरात कॅमेरा नेण्यास बंदी आहे. मंदिरावरती ड्रोन उडवणे बंदी आहे. असे असतानाही मुंबईच्या या तरुणाने ड्रोन उडवून शूटिंग घेतली. हा प्रकार ऋषिक चंद्रचूड, बाबासाहेब गायकवाड आदी काही चाणक्य साई भक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुक वर पोस्ट टाकून हा प्रकार उघडकीस आणला. दैनिक साईदर्शनने तसे वृत्त प्रसारित केले. इतर मीडियाने ही त्याची दखल घेतली. त्यानंतर या प्रकाराची चौकशी होऊन या तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर परिसरात ड्रोन उडवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ड्रोन उडवताना या तरुणाला सुरक्षारक्षकांनी का विरोध केला नाही, सतत सुरक्षारक्षक येथे ड्युटीवर आहेत. सुरक्षारक्षकांची ही जबाबदारी होती की या तरुणाला प्रतिबंध करणे. मात्र तसे झाले नाही. श्री साईबाबा हे जागतिक कीर्तीचे देवस्थान आहे. येथे देश-विदेशातून साईभक्त येतात. या सर्व दृष्टिकोनातून सुरक्षा ही महत्त्वाची आहे. मात्र सुरक्षेलाच अशाप्रकारे तडा जात असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल साईभक्त ग्रामस्थांकडून सध्या होत आहे. साई संस्थांनने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून ग्रामस्थ यांना आधार कार्ड दाखवल्याशिवाय मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र एकीकडे साईभक्त ग्रामस्थांना दर्शनासाठी कडक सुरक्षा करणे आणि दुसरीकडे ड्रोन कॅमेरा मंदिर परिसरात शूटिंग घेत असताना त्याकडे दुर्लक्ष होणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ?असा सवाल ही आता साईभक्त ग्रामस्थांमधून होत आहे. यापुढे तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असे प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. श्री साईबाबा हे सर्वांची काळजी किंवा सर्वांचे रक्षण करणारे आहेत. मात्र संस्थांनचे सुरक्षारक्षक ,महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक ,मंदिरासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा असे सर्व असताना असा हा सुरक्षेला छेद देणारा प्रकार नक्कीच विचार करणारा आहे. यापुढे तरी असे प्रकार घडू नये ,म्हणून सुरक्षा यंत्रणा अधिक सज्ज करणे गरजेचे असल्याचे साई भक्तांमधून बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button