Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
अ.नगरक्राईम

“क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?”

राहाता | प्रतिनिधी
राहाता पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी अवैध व्यवसायांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरू करत साकुरी येथील हॉटेल आठवण परिसरातील कथित क्लबवर छापा टाकून रम्मी जुगार खेळणाऱ्या तिघांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत ४१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी आता नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे — “या क्लबच्या मागे नेमकं कोण आहे?”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कारवाईत दत्तात्रय भोंगळ, किशोर भंगणे आणि संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र स्थानिकांमध्ये असा आरोप केला जात आहे की, ज्या कथित राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने हे क्लब अनेक दिवसांपासून सुरू होते, त्या ‘मुख्य चेहऱ्यावर’ मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
“सामान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल होतात… मग क्लब चालवणाऱ्यांवर कारवाई का नाही?”, “छापे पडतात पण मुख्य मालक कायम बचावतो कसा?”, “कोणाचा राजकीय वरदहस्त या अवैध धंद्यांना संरक्षण देतोय?” असे संतप्त सवाल आता उघडपणे विचारले जाऊ लागले आहेत.


राहाता शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून जुगार, मटका, गुटखा तस्करी आणि कथित क्लब संस्कृती वाढल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. मात्र नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी धडक कारवाया सुरू केल्यानंतर अवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नागरिकांनी आता थेट नूतन पोलीस अधीक्षकांकडे अपेक्षा व्यक्त करत “फक्त किरकोळ कारवाया नकोत… तर या अवैध व्यवसायांच्या मुळावर घाव घालावा,” अशी मागणी केली आहे. “राहाता शहरात राजकीय आशीर्वादावर चालणारे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत,” अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांची नजर आता आणखी काही कथित क्लब आणि अवैध अड्ड्यांवर असून आगामी काळात मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button