Letest News
भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!”
अ.नगरराजकीय

राजेंद्र सुभाषराव कोते यांचे भाचे ऋषिकेश किसनराव आभाळे  यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीश होण्याचा मान मिळवला  

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील प्रतिष्ठित व्यावसायिक राजेंद्र सुभाषराव कोते यांचे भाचे ऋषिकेश किसनराव आभाळे  यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीत तोंड देत राहता तालुक्यातील एकरुखे या गावातील ॲड ऋषिकेश किसनराव  आभाळे  यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जिद्द चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो  याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड ऋषिकेश किसन आभाळे हे झाले आहे. एकरुखे गावातील शेतील राबणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले आहे. ॲड ऋषिकेश आभाळे यांचे दहावीपर्यंत शिक्षण राहाता येथे सेंट जॉन  स्कूल येथे झाले , तर बारावीपर्यंत शिक्षण एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव येथे विज्ञान शाखेत पूर्ण झाले त्यानंतर बारावीला चांगले गुण मिळाल्याने वडिलांच्या सल्ल्यानुसार पुण्यातील फर्ग्युसन विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

घरातील परिस्थिती नाजूक असतानासुद्धा आई वडिलांनी शेतीत प्रचंड कष्ट करून शिक्षणात कुठलीही कमी पडू दिली नाही . अभ्यासात सातत्य व त्यास प्रचंड मेहनतीची जोड असल्यामुळे 2021 मध्ये प्रथम श्रेणी with distinction मिळवत कायद्याची पदवी प्राप्त केली . विधी महाविद्यालयात शिकत असताना वडीलांची इच्छा व न्यायिक क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली व आत्ता निर्धार केला की न्यायाधीश व्हायचे त्या दृष्टीने त्यांची परीक्षा पद्धती ,

पात्रता याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना पुणे येथील आदरणीय ॲड गणेश शिरसाठ सर यांची भेट   घेतली व तेथूनच त्यांनी खऱ्या अर्थाने न्यायिक परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली .


  अभ्यासात सातत्य , संयम व शिस्त या गोष्टी सोबतच आदरणीय ॲड गणेश शिरसाठ सर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत  महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या ” प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व न्यायधीश” ( राजपत्रित क्लास  -१ अधिकारी  ) पदाला गवसणी घातली . यांच्या या परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल राहाता तालुक्यासह शिर्डीत हि  त्यांचे गावात अभिनंदन होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button