Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
अ.नगरराजकीय

गणेशोत्सवात ‘बाप्पाच्या गप्पा’ उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती

शिर्डी, – अपघातात मृत्यू व जखमी होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांच्या वतीने ‘बाप्पाच्या गप्पा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जागृती निर्माण करणे हा आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या उपक्रमाअंतर्गत रस्ता सुरक्षा संदेश देणारे सेल्फी-फलक (सेल्फी स्टॅण्ड) शहरातील गणेश मंडळांना दिले जाणार आहेत. नागरिक व भाविकांनी या फलकासमोर छायाचित्र काढून कार्यालयास तसेच इतर नागरिकांना पाठवावे. छायाचित्रांचा उपयोग सामाजिक माध्यमांवर करून जनजागृती केली जाणार आहे. तसेच, गणेश आरतीपूर्वी अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना रस्ता सुरक्षा शपथ देतील व मार्गदर्शन करतील. सार्वजनिक गणेश मंडळांनी किंवा घरगुती स्तरावर रस्ता सुरक्षा विषयक देखावे सादर करता येतील.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व गणेशोत्सव या विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांनी घरून काढलेली चित्रे शाळेत जमा करावीत व शाळांनी ती एकत्रित करून कार्यालयास सादर करावीत. चित्रकलेचे विषय पुढीलप्रमाणे


१) गणेशोत्सव व दुचाकी वाहनचालकांचे हेल्मेट – सामूहिक सुरक्षा संदेश,
२) गणेशोत्सव व वाहन प्रदूषण – जनजागृतीपर संदेश,
३) गणेशोत्सव व रस्ता सुरक्षा – संयुक्त संदेश.

उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी छायाचित्रे, देखाव्याचे फोटो व व्हिडिओ तसेच स्पर्धकांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक कार्यालयाच्या ई-मेल dyrto.17-mh@gov.in किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवर – श्री. पांडुरंग सांगळे (९९६०६८४५६७) व श्री. गोकुळ सूळ (९०११८९९९३४५) यांना पाठवावेत. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उत्कृष्ट देखावे व चित्रकला स्पर्धकांची पाहणी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करतील.

नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्ता सुरक्षा जनजागृतीस हातभार लावावा, असे आवाहन श्री.जोशी यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button