Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरक्राईम

बंटी जहागीरदार गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपी संगमनेरात अटकेत बंटी जहागीरदार यांचे पार्थिव कडेकोट बंदोबस्तात घरी दाखल

शिर्डी / संगमनेर (साई दर्शन न्यूज) – हाजी बंटी जहागीरदार गोळीबार प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून, या प्रकरणातील आरोपीला संगमनेर येथे अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटकेनंतर आरोपीची कसून चौकशी सुरू असून, चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. तथापि, या प्रकरणातील सर्व बाबींची कायदेशीर पडताळणी व पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बंटी जहागीरदार यांचे पार्थिव मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांच्या निवासस्थानी दाखल करण्यात आले. पार्थिव दर्शनासाठी नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, कायदासुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौजफाटा, दंगल नियंत्रण पथके व वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी बंटी जहागीरदार यांचा अंत्यविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल, जमाव नियंत्रण व सतत गस्त अशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अफवा पसरू नयेत यासाठी सामाजिक माध्यमांवरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
पोलीस तपासात घटनेमागील कारण, वैरभाव, आर्थिक किंवा इतर कोणतेही हेतू, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. शस्त्र कुठून मिळाले, घटना नियोजित होती का, याबाबतही चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीविरोधात संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई न्यायालयीन प्रक्रियेनुसार होणार आहे.
या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांनी शांतता राखावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button