Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरशिर्डी

shirdi news:-रक्तदान करा व श्री साईबाबांचे मोफत व्हिआयपी दर्शन घ्या असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले

“रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा” या श्री. साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु केलेले आहे. हे दोन्ही रुग्णालय अविरत आरोग्य सेवा देत आहेत येथे अनेक असाध्य आजराच्या रुग्णावर उपचार होत असतात,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु रुग्णांना उपचार करत असताना शस्त्रक्रियेच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. त्यामुळे श्री साईबाबा संस्थानने यावर उपाययोजना शोधली असून त्यामुळे शिर्डी मध्ये येणारे सर्व साईभक्तांना श्री साईबाबांचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे यासाठी श्री साईबाबा संस्थानने सुरु केलेल्या रक्त संकलन केंद्रात साईभक्तांनी रक्तदान केले

नंतर त्यांना श्रींचे मोफत व्हिआयपी दर्शन मिळणार आहे यासाठी श्री साईबाबा संस्थानचे श्री साईनाथ रक्तपेढी व गेट नं-०८ दर्शन लाईन येथे निरंतर रक्तदान सुरु आहे.
आता यासाठी आणखी एका रक्त संकलन केंद्रांचे श्री साईआश्रम भक्तनिवास (१००० रुम) येथे दि.०५ सप्‍टेंबर २०२४ रोजी संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते उद्घाटन करणेत आले.

या तिन्ही ठिकाणी रक्तदान करणारे रक्तदात्यास श्री साईबाबांचे मोफत व्ही आय पी दर्शन त्याच दिवशी मिळणार असुन यामुळे भाविकांना बाबांचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. रक्तदान करा व श्री साईबाबांचे मोफत व्हिआयपी दर्शन घ्या असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

उद्घाटनप्रसंगी साईआश्रम भक्तनिवास विभागाचे अधिक्षक विजयराव वाणी यांचे सहयोगाने ५० साईभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केले या सर्व रक्तदात्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करणेत आला.


या कार्यक्रमाप्रसंगी उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मैथिली पितांबरे, रक्त संक्रमणअधिकारी डॉ. सुप्रिया सुंब, साईआश्रम भक्तनिवासचे अधिक्षक विजयराव वाणी, श्री साईबाबा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे व श्री साईनाथ रुग्णालयाचे प्र. अधिसेविका, नजमा सय्यद, डॉ. अशोक गावित्रे यांचेसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button