Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शिर्डी: 

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्सव संस्थानचे नवीन शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

DN SPORTS

kamlakar

या प्रसंगी रेशीम संचालनालय, नागपूरचे उपसंचालक महेंद्र ढवळे, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्यासह विविध विभाग प्रमुख, कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक संकुलाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

त्यांनी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, तसेच सीईटी, नीट व जेईई परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात येणाऱ्या उपक्रमांवर भर दिला. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी जर्मन व जपानी भाषांचे वर्ग तसेच खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा साहित्य खरेदीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात संरक्षण विभाग, फायर अँड सेफ्टी विभाग, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी परेड, कवायती आणि साहसी खेळांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button